Thursday, August 7, 2025
Home बॉलीवूड रस्त्यावर गाणी गाणाऱ्या भिकाऱ्याला ओळखलंत का? आहे बॉलिवूडमधील दिग्गज गायक

रस्त्यावर गाणी गाणाऱ्या भिकाऱ्याला ओळखलंत का? आहे बॉलिवूडमधील दिग्गज गायक

कलाकारांना आपल्या वेगवेगळ्या आणि हटके लूकने चाहत्यांच्या चर्चेत राहायला खूप आवडते. यासाठी ते वेगवेगळे पात्र साकारतात आणि अनोखी वेशभूषा करुन गर्दीच्या ठिकाणी देखील जातात. आपल्याला कोण ओळखतं का? हे त्यांना पाहायचे असते. यामध्ये ते कधी भिकारी, तर कधी रस्त्यावरील फेरीवाले होऊन बसतात. आमिर खानला तर तुम्ही अशा हटके लूकमध्ये पाहिलेच आहे, पण सध्या सोशल मीडियावर आणखी एका कलाकाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

तसा हा व्हिडिओ जुनाच आहे. परंतु सध्या तो पुन्हा चर्चेत आला आहे. व्हिडिओमध्ये एक गरीब भिकारी व्यक्ती रस्त्यावर एका झाडाखाली बसलेला आहे. तसेच त्याच्या हातामध्ये एक पेटी आहे. ही पेटी वाजवत तो गाणे गात आहे. या कलाकाराला ओळखणे खरंच खूप कठीण आहे. तुम्हीही आतापर्यंत त्याला ओळखू शकले नसाल, तर हा कलाकार सर्वांचा लाडका गायक सोनू निगम आहे.

एका मुलाखतीमध्ये या विषयी बोलताना सोनू निगम म्हणाला होता की, “माझ्या आयुष्यातील हा सर्वात चांगला अनुभव आहे. यावेळी एका मुलाने मला बारा रुपये दिले होते. हे पैसे माझ्यासाठी खूप अनमोल आहेत. त्यामुळे मी या पैशांची एक फ्रेम बनवली आणि ती फ्रेम माझ्या ऑफिसमध्ये आहे.”

सोनू निगमने तमिळ, आसामी, पंजाबी, बंगाली, हिंदी, मराठी अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. चित्रपटांसोबतच त्याने स्वतःचे अनेक स्वतंत्र अल्बमही केले आहेत. त्याने संगीताचे शिक्षण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्याकडून घेतले होते. अभिनयामध्ये देखील सोनूने स्वतःचे नशीब आजमावले, पण तिथे त्याला यश आले नाही. त्याने सचिन पिळगावकर यांच्या एका चित्रपटात पहिल्यांदा अभिनय केला होता. तसेच आयुष्यामधील पहिले गाणे मोहम्मद रफी यांचे ‘क्या हुआ तेरा वादा’ हे गायले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आपल्या चिमुकल्यांसह शाहिद अन् मीरा विमानतळावर झाले स्पॉट; तुम्हीही पाहा ‘हा’ सुंदर व्हिडिओ

-‘स्लमडॉग मिलेनिअर’ फेम फ्रिडा पिंटो लवकरच होणार आई, शेअर केले बेबी शॉवरचे फोटो

-प्रतिक्षा संपली! ‘भाईजान’ने जाहीर केली ‘अंतिम’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख, टिझर पाहूनच चाहते खुश

हे देखील वाचा