जेव्हा पहिल्यांदा तुटले होते नुपूर सेननचे हृदय; मन हलके करत म्हणाली, ‘मला रात्री एक वाजता…’


प्रत्येकजण आयुष्यात एकदातरी प्रेमात पडत असतो. प्रेमात माणूस इतका तल्लीन होत असतो की, त्याला आजूबाजूच्या परिस्थितीचे देखील भान राहत. पण जेव्हा त्याचं हृदय तुटत तेव्हा मात्र खूप त्रास होतो. अशाच काहीशा परिस्थितीचा सामना बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननची बहीण नुपूर सेनन हिला देखील करावा लागला आहे. नुपूरने पहिल्यांदाच याबाबत तिच्या मनातील गोष्ट सांगितली आहे. यात तिने सांगितले आहे की, जेव्हा पहिल्यांदा तिचे हृदय कोणीतरी तोडले होते, तेव्हा ती कोणत्या परिस्थितीमधून गेली होती. नुपूर काही दिवसांपूर्वीच ‘फिलहाल २’ या म्युझिक व्हिडिओमध्ये अक्षय कुमारसोबत दिसली होती.

माध्यमातील वृत्तानुसार अभिनेत्रीने सांगितले की, “कॉलेजमध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षाला असताना मी पहिल्यांदा प्रेमात पडले होते. मी अशा कॉलेजमध्ये जिथे प्रत्येक मुलीला एक तरी बॉयफ्रेंड असायचा. परंतु मला ते जास्त काही आवडायचे नाही. कारण मी एक अशी मुलगी आहे, जिला समंजस मुलं आवडतात. त्यामुळे मला आठवतंय त्याप्रमाणे मी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना डेट केले होते.”

तिने पुढे सांगितले की, “मी खरंच खूप भोळी होते. मला वाटायचे प्रत्येकजण खूप चांगला आहे. परंतु त्या मुलाने मला धोका दिला. मला रात्री जवळपास एक वाजता समजले की, तो मला धोका देत आहे. तेव्हा ती माझ्यासाठी खूपच विचित्र परिस्थिती होती. माझ्या आई वडिलांची खोली माझ्या खोलीच्या बाजूला होती. त्यामुळे मी रडत आहे, या गोष्टीची कदाचित पप्पांना जाणीव झाली असावी. मी लगेच माझा मोबाईल बाजूला ठेवला आणि बाथरूममध्ये गेले. एग्जोस्ट फॅन चालू केला आणि खाली बसून खूप रडायला लागले. त्यामुळे मी खूप वाईट प्रसंगात अडकले होते.” नुपूरने सांगितले की, त्यावेळी ती जवळपास २० वर्षांची असेल. (The boy cheated on me nupur senon recounts her first memories of heart break)

नुपूर आणि क्रितीचे नाते खूप घट्ट आहे. त्या दोघींचे फोटो अनेकवेळा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातून त्या बहिणींमधील प्रेम स्पष्ट दिसते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत जोडलं गेलंय सिद्धार्थ शुक्लाचं नाव; तर काजोलच्या बहिणीचाही आहे यादीत समावेश

-सूर्याने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिले खास गिफ्ट; शेअर केला ‘जय भीम’ सिनेमाचा फर्स्ट लूक

-‘सई आयुष्यात आली आणि…’, फोटो शेअर करत आदित्यने सोशल मीडियावर व्यक्त केले दुःख


Leave A Reply

Your email address will not be published.