Wednesday, June 26, 2024

‘द डर्टी पिक्चर’ चा रिमेक येणार, पण विद्या बालनच्या जागी ‘या’ अभिनेत्रीची वर्णी लागणार

बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) हिचे नाव अशा अभिनेत्रींमध्ये घेतले जाते ज्या बहुतेक क्लासिक चित्रपटांसाठी ओळखली जाते. अनेक दिवसांपासून चित्रपटगृहांमध्ये अभिनेत्रीचा कोणताही चित्रपट नसला तरी, काही काळापूर्वी अभिनेत्री तिच्या जलसा चित्रपटासह ओटीटीवर दिसली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना फारसा आवडला नाही, पण विद्या बालनच्या कामाचे नक्कीच कौतुक झाले. याशिवाय विद्या बालन, नसीरुद्दीन शाह आणि इमरान हाश्मी यांचा २०११ साली प्रदर्शित झालेला ‘द डर्टी पिक्चर’ हा चित्रपट त्या काळातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक होता. प्रचंड विरोधानंतर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला मोठ्या पडद्यावर चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता या चित्रपटाचा रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

आता जवळपास एक दशकानंतर त्याच्या सिक्वेलची चर्चा जोर धरू लागली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘द डर्टी पिक्चर’च्या सिक्वेलवर काम सुरू झाले आहे, मात्र अद्याप या चित्रपटासाठी विद्या बालनला संपर्क करण्यात आलेला नाही. या चित्रपटाबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी हा चित्रपट सिल्क स्मिताच्या तरुणाईच्या दिवसांवर आधारित असल्याची बातमी येत आहे. द डर्टी पिक्चरच्या सिक्वेलच्या स्क्रिप्टवर काम सुरू झाले आहे.

द डर्टी पिक्चरची कथा प्रसिद्ध अभिनेत्री सिल्क स्मिताच्या जीवनावर आधारित आहे. एक खेड्यातील मुलगी हिरोईन बनण्याचे स्वप्न घेऊन चेन्नईला पळून जाते आणि नंतर फिल्मी दुनियेत रेशम बनून चित्रपटसृष्टीवर राज्य करते हे दाखवण्यात आले आहे. मात्र, या चित्रपटाच्या सिक्वेलची कथा काही और असू शकते, असेही बोलले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात विद्या बालनच्या जागी क्रिती सेनॉन किंवा तापसी पन्नूलाही अप्रोच केले जाऊ शकते.

बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन हिचे नाव अशा अभिनेत्रींमध्ये घेतले जाते ज्या बहुतेक क्लासिक चित्रपटांसाठी ओळखल्या जातात. अनेक दिवसांपासून चित्रपटगृहांमध्ये अभिनेत्रीचा कोणताही चित्रपट नसला तरी, काही काळापूर्वी अभिनेत्री तिच्या जलसा चित्रपटासह ओटीटीवर दिसली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना फारसा आवडला नाही, पण विद्या बालनच्या कामाचे नक्कीच कौतुक झाले. याशिवाय विद्या बालन, नसीरुद्दीन शाह आणि इमरान हाश्मी यांचा २०११ साली प्रदर्शित झालेला ‘द डर्टी पिक्चर’ हा चित्रपट त्या काळातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक होता. प्रचंड विरोधानंतर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला मोठ्या पडद्यावर चांगला प्रतिसाद मिळाला.

आता जवळपास एक दशकानंतर त्याच्या सिक्वेलची चर्चा जोर धरू लागली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘द डर्टी पिक्चर’च्या सिक्वेलवर काम सुरू झाले आहे, मात्र अद्याप या चित्रपटासाठी विद्या बालनला संपर्क करण्यात आलेला नाही. या चित्रपटाबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी हा चित्रपट सिल्क स्मिताच्या तरुणाईच्या दिवसांवर आधारित असल्याची बातमी येत आहे. द डर्टी पिक्चरच्या सिक्वेलच्या स्क्रिप्टवर काम सुरू झाले आहे.

द डर्टी पिक्चरची कथा प्रसिद्ध अभिनेत्री सिल्क स्मिताच्या जीवनावर आधारित आहे. एक खेड्यातील मुलगी हिरोईन बनण्याचे स्वप्न घेऊन चेन्नईला पळून जाते आणि नंतर फिल्मी दुनियेत रेशम बनून चित्रपटसृष्टीवर राज्य करते हे दाखवण्यात आले आहे. मात्र, या चित्रपटाच्या सिक्वेलची कथा काही और असू शकते, असेही बोलले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात विद्या बालनच्या जागी क्रिती सेनॉन किंवा तापसी पन्नूलाही अप्रोच केले जाऊ शकते. एकता कपूर बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाच्या सिक्वेलची योजना करत आहे.

 हेही वाचा –‘मला संपवायला निघालेल्यांचा सुफडासाफ झाला’, अभिनेते किरण माने यांची पोस्ट चर्चेत
अमिताभ बच्चन यांनी खास शैलीत केले राष्ट्रगीत सादर, व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव
दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा! ह्रदयविकाराच्या झटक्याने ३० वर्षीय अभिनेत्याचे दुखःद निधन

हे देखील वाचा