Friday, March 29, 2024

‘लग्नानंतर पतीवर अवलंबून राहणे चुकीचे की बरोबर?’, चाहत्याच्या प्रश्नावर काय म्हणाली विद्या बालन?

फक्त सुंदर दिसण्यानेच नाही, तर अस्सल अभिनयाच्या जोरावरही यश मिळवता येते, हे दाखवून देणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन होय. अभिनेत्री विद्या ही अनेक तरुण महिला आणि अभिनेत्रींसाठी प्रेरणा आहे. प्रतिभावान अभिनेत्री विद्याने आतापर्यंत तिच्या कारकीर्दीत अनेक हिट सिनेमे दिले आहे. विद्या ही अधिकतर सिनेमांमध्ये निर्भीड महिलांच्या भूमिका साकारताना दिसली आहे. तिने ‘कहाणी’, ‘द डर्टी पिक्चर’, ‘शकुंतला देवी’ आणि ‘शेरनी’ यांसारख्या अनेक आव्हानात्मक सिनेमांमध्ये काम केले आहे. तिने नुकतेच विद्याने इंस्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ सेशन ठेवले होते. यादरम्यान ती कोणत्याही फिल्टरशिवाय दिसली. यामध्ये तिने चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.

विद्याचे दमदार प्रत्युत्तर
एका युजरने लिहिले की, “मुली काम करू शकत नाहीत.” यावर प्रत्युत्तर देताना विद्या बालन (Vidya Balan) म्हणाली की, “तू मला सांगतोय की, विचारतोय?” याव्यतिरिक्त दुसऱ्या एकाने विचारले की, “लग्नानंतर काम करणाऱ्या मुलींचे आयुष्य कसे बदलते?” विद्याने या प्रश्नाचे शानदार उत्तर देत म्हटले की, “आधी ‘मी काम करायची.’ लग्नानंतर ‘आम्ही’ काण करतो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

पुरुषांपेक्षा कमी पगार
लाईव्ह सेशनमध्ये विद्याला विचारण्यात आले की, पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी पगार का दिला जातो? यावर विद्या म्हणाली की, “या प्रश्नाचे उत्तर तर मलाही पाहिजे.” विद्याला विचारण्यात आले की, “लग्नानंतर आपल्या पतीवर आर्थिकरीत्या अवलंबून राहणे चुकीचे आहे का?” यावर अभिनेत्री म्हणाली की, “नाही, बिल्कुल नाही. ही त्यांची आवड आहे. मात्र, मला वैयक्तिकरीत्या वाटते की, कॉफीचा स्वाद तेव्हा आणखी चांगला होतो, जेव्हा तुम्ही ती स्वत: विकत घेता.”

विद्याचा खुलासा
याव्यतिरिक्त या लाईव्ह सेशनमध्ये विद्याने अनेक गुपीतांचा खुलासाही केला. तिने सांगितले की, निर्माता आणि पती सिद्धार्थ रॉय कपूर कशाप्रकारे घरकामात तिची मदत करतो. तिने लिहिले की, “शेवटी हे आमच्या दोघांचंही घर आहे.”

आपल्या सर्वांना माहितीये की, विद्या नेहमीच तिच्या मजेशीर अंदाजासाठी ओळखली जाते. यावेळी जेव्हा तिला विचारण्यात आले की, अधिकतर कंपन्यांचे सीईओ हे पुरुष का आहेत? त्यावेळी अभिनेत्री म्हणाली की, “मला वाटते की, कारण महिला ऑफिसमध्ये उशिरा जातात.” या प्रश्नांव्यतिरिक्त विद्या म्हणाली की, “घर सांभाळण्यात काहीच चुकीचे नाहीये. जर मुलींना याने आनंद होत असेल, तर एक गृहिणी होणे आणि मुलं सांभाळणे योग्य आहे.”

वयाच्या चाळिशी ओलांडलेली विद्या ही ‘नीयत’ या आगामी सिनेमाची शूटिंग संपवून लंडनहून भारतात परतली आहे. विद्या तिच्या ‘द डर्टी पिक्चर’, ‘कहाणी’, ‘भूल भुलैय्या’ यांसारख्या सिनेमांमुळे चाहत्यांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-
‘भाईजान’च्या सुरक्षेसाठी मोठा फौजफाटा, मुंबई विमानतळावर पोहोचताच पोलिसांच्या सुरक्षा घेऱ्यात दिसला सलमान
“केजीएफ चित्रपट तुम्हाला कसा पाहू वाटला?” महेश मांजरेकर यांचा मराठी प्रेक्षकांना सवाल
खालून लहान अन् वरून ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिशाने घेतली जोखीम, चाहत्यांच्या गर्दीत खाली बसून घेतला सेल्फी

हे देखील वाचा