सध्या मनोरंजन क्षेत्रामध्ये सर्वत्र 95 व्या अकादमी पुरस्कारांसाठी म्हणजेच ऑस्कर 2023 नामंकणाची चर्चा सुरु आहे. अशातच आज (दि, 25 जानेवारी) रोजी या नामांकनाची घोषणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये नाटू नाटू या गाणयाला बेस्ट ओरिजन सॉंग ऑस्कर नामांकनासाठी शार्टलिस्ट झालं आहे. ज्यामुळे भारत देशात आनंदाची लाट पसरली आहे. अशातच ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या तामिळानाडु शॉर्ट फिल्मला देखिल डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म या कॅटेगरीत नामांकन जाहिर करमात आलं आहे, जे भारतीयांसाठी खूपच अभिमानास्पद आहे.
नुकत्याच पार पडलेल्या 95 व्या आकादमी पुरस्कार म्हणजेच ऑस्कर 2023 नामंकणाची घोषणा झाली असून भारतीय मनोरंजन सृष्टीध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या डॉक्युमेंट्रीमध्ये तामिळनाडु भागामधील मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील एका कुटुंबाची कथा दर्शवली आहे. याचबरोबरीने या यादीमध्ये ‘How do you measure a year?’, ‘The Martha Mitchell Effect’, आणि’Stranger At The Gate’ या डॉक्युमेंट्री देखिल शर्यतीत होत्या.
‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या डक्युमेंट्रीच्या कथेमध्ये दोन बेबंग हत्तींना दत्तक घेतात आणि त्यांचे संगोपण करतात. ऑस्कर विजेता गुनीत मोंगा यांनी डॉक्युमेंट्रीची निर्मिती केली असून कार्तिकी गोन्साल्विस यांनी दिग्दर्शन केलं आहे. हा डॉक्युमेंट्री 46 मिनिटांची असून एका कुटुंबाचे दर्शन घडवते.
Reason to scream? The Elephant Whisperers has been nominated for an Oscar ???? pic.twitter.com/I4zTnEkiQq
— Netflix India (@NetflixIndia) January 24, 2023
95 वा आकदमी पुरस्कार सोहळा (25 जानेवारी) रोजी लॉस एंजेलिसमधील ओव्हेशन हॉलिवूड येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडणार आहे . या पुरस्कार सोहळ्याचे सुत्रसंचालन जिमी किमेल हा करणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मी अक्षरशः मला विसरते…’ म्हणत मधुराणी प्रभुलकरने शेअर केली तिला स्वतःचाच विसर पडणाऱ्या गोष्टीची पोस्ट
जेनिफर विंगेटची मोहक अदा, फोटो गॅलरी फक्त तुमच्यासाठी…