Sunday, June 22, 2025
Home बॉलीवूड ‘मला चंद्राची उपमा देणारी ती आज…’ आईच्या निधनानंतर अभिनेत्याची भावुक पोस्ट चर्चेत

‘मला चंद्राची उपमा देणारी ती आज…’ आईच्या निधनानंतर अभिनेत्याची भावुक पोस्ट चर्चेत

चित्रपटसृष्टीशी संबंधित एक वाईट बातमी समोर आली आहे. अभिनेता शारीब हाश्मीची (Sharib Hashmi) आई आणि प्रसिद्ध पत्रकार झेड ए जोहर यांची पत्नी नजमा सय्यद यांचे निधन झाले आहे. १२ ऑगस्ट रोजी मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ७९ वर्षांच्या होत्या. वयोमानानुसार आजारांवर उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात चार मुले व दोन मुली आहेत.

खुद्द शारीब हाश्मीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. त्याने आईच्या फोटोसोबत एक हृदयस्पर्शी पोस्टही लिहिली आहे. अभिनेत्याने ट्विट केले की, ‘जिने मला टमेरा चंदा’ म्हटले, ती स्वतः आकाशातील तारा बनली. प्रार्थना करा की अल्लाह माझ्या आईला माफी देईल आणि तिला त्या स्वर्गात आशीर्वाद देईल.”

शारीबच्या या ट्विटवर चाहते त्याच्या आईला श्रद्धांजली वाहत आहेत. एका ट्विटर युजरने लिहिले, ‘विनम्र श्रद्धांजली.’ त्याचवेळी दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.’ आणखी एका यूजरने लिहिले की, ‘त्यांच्या प्रार्थना नेहमी तुमच्यासोबत असतील. RIP.’

शारीब याची गणना चित्रपटसृष्टीतील अशा अभिनेत्यांमध्ये केली जाते, ज्यांना त्यांच्या कलेवर खूप प्रेम आहे. त्याने आतापर्यंत आपल्या अनेक अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. ‘फिल्मिस्तान’ चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेचे ​​खूप कौतुक झाले होते. याशिवाय त्याने मनोज बाजपेयीसोबत ‘फॅमिली मॅन’ वेब सीरिजमध्ये काम केले आहे. या वेब शोमधील त्याचा अभिनय लोकांना आवडला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

अभिनेत्याच्या निधनानंतर पत्नीवर मोठं संकट, ‘एवढ्या’ लाखांच्या कर्जाखाली दबलंय दीपेश भानचं कुटुंब
सारा अली खानला वाढदिवसानिमित्त न्यूयॉर्कमध्ये मिळाले मोठे सरप्राईज, चाहत्याने थेट रस्त्यावरच…
भगत सिंगवर बॉलीवूडमध्ये बनले आहे सर्वाधिक चित्रपट, पाहा यादी……

हे देखील वाचा