कोरोनाच्या दुसर्या लाटेनंतर आता चित्रपट निर्माते-दिग्दर्शक आपापले चित्रपट घेऊन खुल्या चित्रपटगृहांमध्ये पोहोचण्याची हिंमत हळूहळू एकवटत आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक चित्रपट चित्रपटगृहात दाखल होत आहेत. ‘सॅन ८४ जस्टिस’ चित्रपट मंगळवारी (२ नोव्हेंबर) चित्रपटगृहात पोहोचला आहे. दिग्दर्शक संदीप कुमार राणा यांच्या ‘सन ८४ जस्टिस’ या द्विभाषिक चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग दिल्लीत आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये अनेकांनी सहभाग घेतला. यामध्ये अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इक्बाल सिंग लालपुरा, माजी लष्करप्रमुख जनरल जेजे सिंग, वरिष्ठ अधिवक्ता एचएस फुलका, जागो पक्षाचे अध्यक्ष मनजीत सिंग, रोमानियाच्या राजदूत डॅनिएला सेजोनोव, मनिंदर सिंग, अकाली दलाचे बन्नी जॉली सिंग आणि जसविंदर सिंग जॉली यांचा समावेश होता. प्रेक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले आणि चित्रपट संपल्यानंतर सर्वांनाच अश्रू अनावर झाले. चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.
१९८४च्या दंगलीवर आहे आधारित आहे चित्रपट
हा चित्रपट १९८४ मध्ये माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर शोषित शीख कुटुंबांच्या जीवनाभोवती फिरतो. या चित्रपटाच्या पोस्टरचे २०१९ मध्ये प्रतिष्ठित कान चित्रपट महोत्सवात अनावरण करण्यात आले होते. या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि आता तो देशातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
निर्माते जितेश कुमार आणि मुजीब उल हन यांनी या चित्रपटाच्या विकासाबद्दल त्यांची उत्कंठा शेअर केली. ते म्हणाले की, “आम्ही खूप उत्सुक आहोत की, आमचा चित्रपट भारतीय प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळेल. आपल्या देशात अनेक महत्त्वाच्या कथा सांगायच्या आहेत आणि काही महान प्रतिभा आहेत. ‘सन ८४ जस्टिस’साठी प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रियांची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.
हिंदी-पंजाबी भाषेत आहे चित्रपट
‘सन ८४ जस्टिस’ हा ७८ मिनिटांचा हिंदी-पंजाबी चित्रपट आहे, जो उदरनिर्वाहासाठी तांदूळ विकणाऱ्या कुटुंबाची कथा सांगतो. कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातील गुरफतेह सिंग आपल्या तीन मुलांसह, भाऊ आणि पत्नीसह राहतात. जिथे सर्वजण एकत्र राहतात आणि काम करतात. गुरफतेह सिंग आपल्या व्यवसायातून पुरेसे उत्पन्न मिळवू शकत नसल्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यासाठी छोट्या नोकऱ्या करतात. त्याचा एक मित्र त्याला तांदूळ आणि गहूमध्ये छोटे खडे मिसळण्याचा सल्ला देतो, परंतु गुरफतेह एक प्रामाणिक माणूस आहे जो तसे करण्यास स्पष्टपणे नकार देतो.
दरम्यान, इंदिरा गांधी यांची शीख सुरक्षा दलाद्वारे हत्या केली जाते. ही बातमी शीख कुटुंबांसाठी धोक्याची ठरते कारण जातीयवादी लोक या घटनेचा गैरफायदा घेत अराजक माजवतात. त्यामुळे शहरात हिंसाचार वाढत असून, अनेक शीख कुटुंबातील लहान मुले, महिलांचा बळी जातो. स्त्रिया विधवा होतात. अनेक शिखांचे नुकसान झाले, हजारो लोकांचे प्राण गेले आणि अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली.
२ नोव्हेंबर २०२१ रोजी चित्रपटगृहात झाला प्रदर्शित
या चित्रपटात गुरफतेह सिंगच्या भूमिकेत विपिन शर्मा, जीत कौरच्या भूमिकेत सुपर्णा मारवाह, अजित सिंगच्या भूमिकेत आशिष सहदेव, अंजन कुमारच्या भूमिकेत जितेंद्र राय आणि जनार्दनच्या भूमिकेत मनोज बक्षी यांनी काम केले होते. जितेश कुमार फिल्म्स आणि यूएफआय प्रॉडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली असून, अभिषेक वर्मा प्रस्तुत करत आहेत. ‘सन ८४ जस्टिस’ २ नोव्हेंबर २०२१ रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला आहे.
विशेष म्हणजे ‘सन ८४ जस्टिस’ रजनीकांत यांचा ‘अन्नात्थे’, अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ आणि ‘मार्वल के इटरनल्स’ दिवाळीच्या आठवड्यात प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे भारतीय प्रेक्षकांसाठी हा आठवडा मनोरंजनाने परिपूर्ण असणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सिल्व्हर रंगाच्या शिमरी गाऊनमधे करिश्मा कपूरचा घायाळ करणारा अंदाज पाहिला का?
-करीनाचा चिमुकला जेह दिसला आत्या सबाच्या मांडीवर खेळताना; पाहा ‘हा’ गोंडस फोटो










