बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) आज हजारो लोकांचा मसिहा बनला आहे. कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत त्याने अनेक अडचणीने त्रस्त, गरजू आणि गरीब लोकांना मदत करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून सोनू सूदला मदत करण्याची सवयच सुरूच आहे. विशेष मदतीसाठी अभिनेत्याच्या घराबाहेर त्रस्त आणि गरीब लोकांची रांग लागली आहे. तक्रारदार सोनू सूदकडे मदतीची याचना करत आहे. त्याचबरोबर तो लोकांच्या समस्याही पूर्ण आदराने ऐकून घेतो आणि मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहून नेटकऱ्यांनी सोनू सूदचे कौतुक केले आहे.
सोनू सूद हा हिंदी सिने जगतातील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने आणि भूमिकांनी त्याने सिने जगतात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र अभिनेता सोनु सूद त्याच्या दिलदारपणासाठीही विशेष प्रसिद्ध आहे. सोनूकडे मदत मागण्यासाठी गरजूंची अक्षरशः रांग लागलेली असते. सध्या असाच तक्रारदारांची बाजू ऐकताना सोनू सूदचा पुन्हा एकदा एक व्हिडिओ समोर आला आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर सोनू सूदचा लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये अभिनेता सोनू सूद गरीब लोकांच्या समस्या ऐकताना दिसत आहे. सोनू सूदच्या घराबाहेर शेकडो गरीब आणि गरजू लोक रांगेत उभे असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
View this post on Instagram
सोनू सूद त्यांच्याकडे जाऊन प्रत्येकाच्या समस्या ऐकून घेत आहेत. व्हिडिओमध्ये, एक लहान मुलगी सोनू सूदला तिचा त्रास सांगताना रडताना दिसत आहे, ज्याला अभिनेता तिला गप्प करताना दिसत आहे. सोनू सूदचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दिग्गज अभिनेत्याच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. यासोबत कमेंट करत सोनू सूदचे कौतुक करत आहे. एका चाहत्याने त्याच्या कमेंटमध्ये लिहिले की, “हाच खरा हिरो आहे.” तर आणखी एका चाहत्याने लिहिले की, “सोनू सूदसारखी व्यक्ती राजकारणात असावी. अशा लोकांची भारताला गरज आहे,” सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
हेही वाचा –
घटस्फोटानंतर १० महिन्यांनी नागा चैतन्यने केले मन मोकळे, सांगितली ‘ती’ भयाण गोष्ट