‘खतरों के खिलाडी’ कार्यक्रमात नवा ट्विस्ट, ‘या’ दिग्गज स्पर्धकाला रोहित शेट्टीने दाखवला बाहेरचा रस्ता

0
61
KKK 12
File Photo

सध्या टेलिव्हिजनवरील ‘खतरों के खिलाडी १२’ हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आला आहे. कार्यक्रमात रोज नवनवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. खतरों के खिलाडी 12 ची स्पर्धक शिवांगी जोशीला या आठवड्यात शोमधून बाहेर काढण्यात आले आहे. एरिका पॅकार्ड आणि अनेरी वजानी यांच्यानंतर बाहेर पडणारी ती तिसरी स्पर्धक आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी हा शो होस्ट करत आहे. त्याची ही सातवी वेळ आहे. यावेळी केपटाऊनमध्ये शो आयोजित करण्यात आला आहे. या सीझनमध्ये स्पर्धकांना शोमध्ये टिकून राहण्यासाठी धोकादायक स्टंट्स करावे लागतात. मात्र, शिवांगी जोशीचा प्रवास आता इथेच संपला आहे.

एलिमिनेशन राऊंडमध्ये कनिका, प्रतीक आणि शिवांगी यांच्यात चुरशीची लढत झाली. एलिमिनेशन स्टंट प्रथम कनिकाने पूर्ण केला. प्रतीक दुसऱ्या क्रमांकावर होता. काही सेकंदांमुळे त्याने दुसरे स्थान पटकावले. तर शिवांगी तिसऱ्या क्रमांकावर राहिली, ज्यामुळे तिला शोमधून बाहेर व्हावे लागले. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर शिवांगी बालिका वधू 2, बेगुसराय, ये रिश्ता क्या कहलाता है यासह अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसली आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते.

खतरों के खिलाडी सीझन 12 बद्दल बोलायचे झाले तर, चित्रपट निर्माता रोहित शेट्टी नेहमीप्रमाणे यावेळीही शो होस्ट करत आहे. शोचा प्रीमियर 02 जुलै रोजी झाला. खतरों के खिलाडी 12 चे स्पर्धक रुबिना दिलीक, सृती झा, जन्नत जुबेर, कनिका मान, प्रतीक सहजपाल, मोहित मलिक, तुषार कालिया, चेतना पांडे, राजीव अडातिया, निशांत भट, कनिका मान आहेत. हा शो तुम्ही कलर्स टीव्ही आणि वूटवर दर शनिवारी आणि रविवारी पाहू शकता. सध्या या कार्यक्रमाने प्रेक्षकांना चांगलेच वेड लावले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here