Tuesday, July 9, 2024

दु:खद! ‘द गॉडफादर’ फेम अभिनेत्याचे निधन, ४ पत्नीपैकी एकीनेही नाही दिली आयुष्यभर साथ

हॉलिवूडमधून हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. ‘द गॉडफादर’ सिनेमात मार्लन ब्रँडो या माफिया डॉनच्या मुलाची म्हणजेच सन्नी कोरलियोन याची भूमिका साकारणारा अभिनेता जेम्स कान यांना बुधवारी (दि. ०६ जुलै) देवाज्ञा झाली. जेम्स ८२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर अवघी सिनेसृष्टी शोकसागरात आहे. त्यांचे चाहते आणि अनेक कलाकार त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करत आहेत.

जेम्स कान (James Caan) यांना ‘द गॉडफादर’ व्यतिरिक्त ‘ब्रायन्स साँग’ यांसारख्या सिनेमांनी हॉलिवूड स्टार बनवले होते. माध्यमांतील वृत्तांनुसार, कान कुटुंबीयांनी गुरुवारी (दि. ०७ जुलै) त्यांच्या निधनाची माहिती दिली. कान यांच्या ट्विटर अकाऊंटवर ट्वीट करत लिहिले गेले की, “जड अंत:करणाने सांगितले जात आहे की, ६ जुलैच्या सायंकाळी जिमीचे निधन झाले आहे. कुटुंबीयांकडून तुम्ही दिलेल्या प्रेम आणि संवेदनासाठी कृतज्ञता. तुम्ही या कठीण काळात त्यांच्या खासगीपणाचा सन्मान करा.”

अमेरिकेत झालेला कान यांचा जन्म
जेम्स यांनी ‘मिजरी’, ‘एल्फ’, ‘चोर’, ‘गॉडफादर पार्ट-२’, ‘ब्रायन्स साँग’ आणि ‘द गँबलर’ यांसारख्या सिनेमात जबरदस्त भूमिका साकारली होती. ते शेवटचे ‘क्वीन बीज’ या रोमँटिक कॉमेडी सिनेमात झळकले होते. हा सिनेमा २०२१ साली प्रदर्शित झाला होता. जेम्स कान यांच्याबाबत बोलायचं झालं, तर त्यांचा जन्म अमेरिकेच्या ब्रोंक्स येथे २६ मार्च, १९४० रोजी झाला होता. त्यांनी मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी आणि हाफस्ट्रा युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतले होते.

जेम्स कान यांच्या मॅनेजरने केले दु:ख व्यक्त
जेम्स कान यांच्या निधनावर (James Caan Death) मोठमोठ्या कलाकारांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांचे मॅनेजर मॅट डेल पियानो यांनी सांगितले की, “जिमी महान व्यक्तींपैकी एक होते. ते फक्त एक चांगले अभिनेताच नाही, तर एक मजेशीर व्यक्तिमत्त्व, प्रामाणिक, काळजी घेणारे आणि चांगले होते.”

त्यांनी न्यूयॉर्कमध्ये सॅनफोर्ड मीस्नरच्या नेबरहुड प्लेहाऊस स्कूल ऑफ थिएटरमधून शिक्षण घेतले होते. त्यांचे वैवाहिक आयुष्यही चांगलेच चर्चेत राहिले. त्यांनी एक नाही, दोनही नाही, तब्बल चार लग्न केली. मात्र, कोणत्याच पत्नीने त्यांच्यासोबत आयुष्य घालवले नाही. डी जे मॅटिस, शीला रयान, इंग्रिड हाजेक आणि लिंडा स्टोक्स या त्यांच्या चार पत्नी होत्या. त्यांना स्कॉट केनसह ५ मुले आहेत.

जेम्स कान यांच्या निधनाने कलाविश्वाने एक चांगला अभिनेता गमावला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

कपूर खानदानाचा ‘तो’ नियम मोडण्यासाठी नीतू यांना लागली होती २६ वर्षे, २१व्या वयात थाटलेला संसार

प्रतिभावान अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तापसी पन्नूच्या ‘या’ भूमिकांनी जिंकलीत प्रेक्षकांची मने

अभिनेत्री करीना कपूरसोबत करण जोहरला जायचय बिग बॉसच्या घरात, म्हणाला ‘कारण ती खूपच…’

हे देखील वाचा