Wednesday, June 25, 2025
Home अन्य ‘या’ अभिनेत्रीचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, चाहत्यांना ओळखणे झाले कठीण

‘या’ अभिनेत्रीचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, चाहत्यांना ओळखणे झाले कठीण

अभिनय क्षेत्रातील अनेक कलाकारांचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अनेक कलाकार त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत, हे जुने फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. परंतु हे बालपणीच्या फोटोमधील कलाकार ओळखणे मात्र चाहत्यांना कठीण जाते. असाच एका आघाडीच्या अभिनेत्रीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खळखळून हसणारी ही छोटी मुलगी आता मोठी झाली असून, ‘द कपिल शर्मा’ या कार्यक्रमात प्रमुख कलाकाराची भूमिका करत आहे.

नुकताच सोशल मीडियावर एका गोंडस मुलीचा फोटो समोर आला आहे, जो चांगलाच व्हायरल होत आहे. परंतु हा बालपणीचा फोटो कोणत्या अभिनेत्रीचा आहे, हे ओळखणे चाहत्यांना कठिण झाले आहे. अनेकांनी याबाबत अचूक नाव सांगितले आहे, मात्र अजूनही अनेकजण या फोटोबाबत विचारात पडले आहेत. (the kapil sharma show fame sumona chakravarti unrecognizable childhood photo)

हा व्हायरल फोटो आणि त्यामधील गोंडस मुलगी ‘द कपिल शर्मा’मधील प्रमुख कलाकार आहे. या फोटोमधील गोंडस मुलगी कपिल शर्मा शोमध्ये कपिलच्या पत्नीची भूमिका करणारी सुमोना चक्रवर्ती आहे. सुमोना चक्रवर्ती आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि अदांनी प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. अलीकडेच सुमोनाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन बालपणीचे दोन फोटो शेअर केले होते. ज्यामधील एका फोटोमध्ये ती ओढणी घेऊन आपल्या आजोबांच्या मांडीवर बसली आहे. तर दुसर्‍या फोटोमध्ये खळखळून हसताना दिसत आहे.

सुमोना चक्रवर्तीने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर तुम्ही ते पाहू शकता. सुमोना चक्रवर्ती सध्या लोकप्रिय अभिनेत्री असून आपल्या विनोदी शैलीमुळे तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

दरम्यान ती मीडियावर सतत सक्रिय असते. तिचे इंस्टाग्रामवर तब्बल १.१ दशलक्ष इतके फोलॉवर्स आहेत. शोमध्ये कपिल शर्माच्या पत्नीची भूमिका करणारी सुमोना सोशल खूपच ग्लॅमरस आहे. ती सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. आपल्या अधिकृत अकाऊंटवरुन ती अनेकदा फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

‘बडे अच्छे लगते है’ या कार्यक्रमातून सुमोना पहिल्यांदा घराघरात पोहोचली होती. सध्या नव्याने सुरू झालेला ‘कपिल शर्मा शो’ सुद्धा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस १५’ सापडला वादाच्या विळख्यात, सेट डिझाईनरवर लावले जातायेत चोरीचे आरोप

-‘अशक्य सुंदर’, अमृता खानविलकरचा फोटो पाहून चाहते तर सोडाच, कलाकारांनीही पाडला कमेंट्सचा पाऊस

-‘कुछ कुछ होता है अभ्या…’, म्हणत ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षयाने मजेशीर फोटो केले शेअर

हे देखील वाचा