Monday, July 1, 2024

पुन्हा एकदा प्रेक्षकांना पोट धरून हसवायला कपिल शर्माची टीम सज्ज; ‘या’ तारखेला होणार प्रसारित

कॉमेडियन कपिल शर्माच्या चाहत्यांना या वर्षाच्या सुरूवातीलाच मोठा धक्का बसला होता, कारण त्यांच्या आवडत्या कॉमेडियनचा शो ऑफ एअर जाण्याच्या बातम्या आल्या होत्या. कपिलचा सुपरहिट कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ फेब्रुवारीमध्ये बंद झाला होता. यामागचे कारण म्हणजे, कपिल वडील बनला होता. १ फेब्रुवारीला कपिल एका मुलाचा वडील झाला आणि आपल्या कुटुंबाला वेळ देण्यासाठी कपिलने शोमधून काही महिन्यांसाठी ब्रेक घेतला होता.

तेव्हापासूनच चाहते कपिलचा शो पुन्हा सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता कपिलच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. बातमी अशी आहे की, कपिल शर्माचा शो पुन्हा सुरू होणार असून, लवकरच त्याचे शूटिंग सुरू होईल.

माध्यमांतील वृत्तांनुसार, ‘द कपिल शर्मा शो’ जुलै महिन्यातील २१ तारखेपासून प्रसारित होणार आहे. हा शो मागील सिझनपेक्षा थोडा हटके असेल आणि तो नवीन पद्धतीने सादर केला जाईल. शोच्या नवीन सिझनचे शूटिंग जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार असल्याचे म्हटले जात आहे.

या सिझनमध्ये कपिल शर्मासोबत भारती सिंग, किकू शारदा, सुमोना चक्रवर्ती, चंदन प्रभाकर यांच्यासह इतर कलाकारही पाहायला मिळतील. नवीन सिझनमध्ये कोव्हिड प्रोटोकॉलची काळजी घेतली जाईल. मात्र, जेव्हा हा शो सुरू होईल, तेव्हा त्यात लाईव्ह ऑडियन्स असतील की नाही, अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

यावर्षी हा कार्यक्रम बंद झाला होता, तेव्हा देखील लाईव्ह ऑडियन्स हा एक मोठा घटक होता. निर्मात्यांना असे वाटत होते की, कोरोनामुळे लाईव्ह ऑडियन्सलाही आमंत्रित करता येणार नाही किंवा कलाकारही प्रमोशनसाठी येऊ शकणार नाहीत. अशा परिस्थितीत, निर्मात्यांना शो बंद करणेच योग्य वाटले. आता या शोची नवी धमाल पाहण्यासाठी चाहते बरेच उत्सुक असतील, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा