Saturday, June 29, 2024

‘द कपिल शर्मा शो’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, शोच्या पुनरागमनाबद्दल कृष्णा अभिषेकने दिली ‘मोठी’ माहिती

आपल्या दिलखुलास अभिनयाने आणि विनोदाने सगळ्यांचे मनोरंजन करून खळखळून हसवणारा शो म्हणजे सोनी टीव्हीवरील ‘द कपिल शर्मा शो.’ कपिल शर्मा शो प्रेक्षकांसाठी एक गोड बातमी देणार आहे. ती म्हणजे हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला परत येणार आहे. हो अगदी बरोबर वाचलं. कपिल शर्मा हा प्रेक्षकांना हसवायला परत एकदा सज्ज झाला आहे. जेव्हापासून हा शो ऑफ एअर झाला आहे, तेव्हापासून सगळ्या प्रेक्षकांना या शोची आणि त्यातील कलाकारांची खूपच आठवण येतं आहे. हा शो पुन्हा कधी चालू होणार याबाबत प्रेक्षकांमध्ये चर्चा चालू असताना कपिल शर्माने हा शो पुन्हा चालू करण्याची घोषणा केली आहे. तसेच कृष्णा अभिषेकनेही माहिती दिली आहे.

कपिल शर्माने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून बानिजय याचे ट्वीट रिट्विट करत लिहिले आहे की, “माझं सिलेक्शन झाले आहे, आता तुमची बारी.” म्हणजे या पोस्टमध्ये असे लिहले आहे की, जर तुम्ही ॲक्टर किंवा राईटर असाल कपिल शर्मा शोमध्ये तुम्हाला संधी मिळू शकते.

कृष्णा अभिषेकने एका मुलाखतीत सांगितले की, “कपिल शर्मा हा शो मे मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजून आम्ही तारीख नाही ठरवली. पण या वेळेस या शोमध्ये तुम्हाला काहीतरी नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत. यासाठी नवीन सेट बनवला जाणार आहे. तसेच अनेक गोष्टींमध्ये बदल केला जाणार आहे.”

कृष्णाने मुलाखतीत पुढे सांगितले की, “मी या शो ला खूप मिस करत आहे. कारण आम्ही सेटवर खूप मस्ती करत असतो. त्यामुळे आम्हाला कळत देखील नसे की, दिवस कसा निघून जातोय. कपिल आणि मी याबाबत फोनवर अनेक गोष्टी बोलत असतो. कारण आमच्या दोघांची हीच इच्छा आहे की, हा शो लवकरात लवकर सुरू व्हावा.”

कपिल शर्मा हा फेब्रुवारीमध्ये बाबा झाला आहे. यानंतर त्याने पालकत्व रजा घेतली होती. त्यामुळे हा शो बंद झाला होता. त्यामुळे कपिल शर्माचे चाहते खूपच उदास झाले होते. या शोचा शेवटचा एपिसोड 31 जानेवारी का टेलिकास्ट झाला होता. कोरोना महामारीमुळे शोमध्ये प्रेक्षकांना बोलावले नव्हते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आलियानंतर राम चरणचा ‘या’ चित्रपटातील लूक व्हायरल, मिळतोय जबरदस्त प्रतिसाद

-‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री पडली होती टीव्हीवर भावाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या प्रेमात, १६ व्या वर्षी निभावले होते सूनेचे पात्र

-चित्रपटात बेड सीन देताना शाहरुखने केलं ‘असं’ काही, काजोलसह सर्वजण झाले होते चकित

हे देखील वाचा