Saturday, June 29, 2024

ठरलं तर! कपिल अन् त्याची गॅंग ‘या’ दिवशी करणार टीव्हीवर पुनरागमन; तर शोचा पहिला पाहुणा असणार…

 

आजच्या काळात माणूस त्याच्या व्यापारात इतका मग्न असतो, की त्याला इतर गोष्टी काय तर स्वतःकडे देखील लक्ष द्यायला वेळ नसतो. अशा वेळेला त्याच्याकडे जो काही थोडाफार वेळ असतो त्यावेळेत तो टीव्ही लावून बसतो. मात्र टीव्हीवर देखील त्याच त्याच रटाळ मालिका बघणे अनेकांना आवडत नाही. मग अशा वेळेला सर्वाना एकच शो आठवतो आणि तो म्हणजे, कपिल शर्मा शो. मागील अनेक वर्षांपासून हा शो आणि या शोमधील सर्वच कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवत त्यांचे मनोरंजन करत आहे. मागील काही महिन्यांपूर्वी हा शो काही काळापुरता बंद झाला होता मात्र लवकरच हा शो पुन्हा सुरु होत आहे. कपिलचा हा शो प्रेक्षकांसाठी एक लाफ्टर थेरपी म्हणून काम करतो.
instagramkrushna30

कपिल शर्मा शो बंद झाल्यानंतर लगेच शो पुन्हा कधी सुरू होईल याच्या चर्चा रंगायला लागल्या होत्या. प्रेक्षक अगदी चातक पक्ष्यासारखी या शोची आतुरतेने वाट बघत होते. नुकतेच या शोचे नवीन प्रोमो टीव्हीवर दिसत आहे, त्यामुळे लवकरच हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येईल. प्राप्त माहितीनुसार हा शो येत्या २१ ऑगस्ट पासून सुरु होण्याची दाट शक्यता आहे. मात्र शोच्या सुरुवातीची खरी आणि अधिकृत तारीख अद्याप समजली नाहीये. (Akshay Kumar Will Be The First Guest of The Kapil Sharma Show)

सध्या सोनी चॅनेलवर इंडियन आयडल हा सिंगिंग शो सुरु आहे. या शोचा शेवटचा भाग १५ ऑगस्ट रोजी संपन्न होणार असल्याने, त्यानंतर इंडियन आयडलचा टाइम स्लॉट कपिल शर्मा शोला मिळेल असे सांगितले जात आहे.

आता शो सुरु होणार हे तर पक्के आहे, मात्र या शोमध्ये पहिला कोणता कलाकार येणार याबद्दल देखील चर्चा रंगत आहे. एका माहितीनुसार या शोमध्ये नवीन पर्वाच्या पहिल्या भागात अक्षय कुमार हजेरी लावणार असल्याचे सांगितले जात आहे. अक्षय यापूर्वी देखील अनेकदा यामध्ये आला असून, आता तो त्याच्या आगामी ‘बेल बॉटम’ सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी येणार असल्याचे सांगितले जात आहे.

कपिल शर्मा शोच्या या नवीन पर्वाच्या प्रोमोमध्ये पाहिले तर लक्षात येईल की, यात एक नवीन चेहरा दिसत आहे. कॉमेडी सर्कस गाजवणारे मोठे कॉमेडियन सुदेश लहिरी पहिल्यांदाच या शोचा भाग बनणार आहे. सोबतच कपिल शर्माच्या बायकोची भूमिका साकारणारी सुमोना प्रोमोमधून गायब दिसत आहे. या प्रोमोवरून शोमध्ये लाईव्ह प्रेक्षक देखील असणार असल्याची हिंट मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जिया खान आत्महत्या प्रकरणाची धुरा विशेष सीबीआयच्या हातात; सूरज पांचोली म्हणाला, ‘…मला शिक्षा झालीच पाहिजे’

-करिश्मासोबत नाते तोडून अभिषेकने का केले तीन वर्षांनी मोठी असणाऱ्या ऐश्वर्यासोबत लग्न? कारण ऐकून व्हाल हैराण

-लाजुन लाल झाला शाहिद कपूर, जेव्हा मीराने शेअर केले बेडरूम सिक्रेट; म्हणाली, ‘मला वाटतं तो कंट्रोल…’

हे देखील वाचा