Friday, April 25, 2025
Home बॉलीवूड अंतरा मारवाहच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला संपूर्ण कपूर कुटुंबाची हजेरी, कपूर सिस्टर्सने केली धमाल

अंतरा मारवाहच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला संपूर्ण कपूर कुटुंबाची हजेरी, कपूर सिस्टर्सने केली धमाल

दिग्गज अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी रिया कपूर नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. करण बुलानीसोबत रियाने १४ ऑगस्टला खासगी समारंभात विवाह केला आहे. या मंगल कार्यावेळी संपूर्ण कपूर कुटुंबीय एकत्र दिसले. कपूर कुटुंब लग्नाच्या सेलिब्रेशनच्या मुडमधून अजून बाहेरही आले नव्हते तोपर्यंत पुन्हा कपूर कुटुंबाने त्यांचा एक नवीन आनंद साजरा केला आहे.

सोनम कपूरचा चुलत भाऊ मोहित मारवाह आणि त्याची पत्नी लवकरच आई-बाबा होणार आहेत. त्यानिमिताने अंतरा मारवाहचा डोहाळ जेवणाचा समारंभात मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. नुकताच हा समारंभ झाला असून याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या डोहाळेजेवणच्या कार्यक्रमाला लहानांपासून मोठ्यांपर्यंत संपूर्ण कपूर झाडून कुटुंब उपस्थित होते.

अंतरा मारवाह ही एक फॅशन स्टायलिस्ट असून, तिने मोहित मारवाहसोबत २०१८ साली लग्न केले. सोनम कपूरने अंतराच्या डोहाळ जेवणाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर हे फोटो व्हायरल तर झाले आहे, सोबतच अंतरा आणि मोहितवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहेत. या डोहाळेजेवणाचे एक मोठे आकर्षण होते ते आलेल्या सर्व पाहुण्यांचे रिच आणि लक्षवेधी कपडे. डोहाळेजेवणाच्या फोटोमध्ये अंतराने पिवळ्या रंगाचा एक ट्रॅडिशनल ड्रेस परिधान केला असून फॅशन दिवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनमने ऑफ व्हाईट रंगाचा अनारकली घातला आहे. या फोटोमध्ये नववधू रियासुद्धा आकर्षक लूकमध्ये दिसत आहे. सोबतच अर्जुन कपूर आणि त्याची बहीण अंशुला देखील दिसत आहे. अर्जुन कपूरने व्हाईट रंगाचा कुर्ता परिधान केलाय. फोटोमध्ये रोषणाई आणि मोठी चमकधमक दिसत आहे.

यावेळी सोनम कपूरचा असणारा लूकला तिच्या चाहत्यांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला आहे. आकर्षक ड्रेससोबत लाईट मेकअप आणि हिरव्या रंगाचे दागिने तिच्या लुकला अधिकच उठावदार करत आहे. या कार्यक्रमाला हर्षवर्धन आणि जान्हवी कपूर उपस्थित नव्हते. त्यामुळे सोनमने कार्यक्रमाचे फोटो पोस्ट करत या दोघांना खूप मिस केल्याचे लिहिले आहे.

या फोटोंवर कपूर कुटुंबातील जान्हवी, खुशी आणि संजय कपूर यांनी देखील त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच अर्जुन कपूरने देखील या फोटोंना त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहे. मोहित मारवाह हा अनिल कपूर, बोनी कपूर, संजय कपूर यांच्या बहीणच रीना कपूरचा मुलगा असून त्याने ‘फगली’ सिनेमात अभिनयात पदार्पण केले होते. तर अंतरा मोतीवाला मारवाह ही अभिनेत्री टीना अंबानी यांची भाची आहे. अंतराची आई भावना आणि टीना या सख्या बहिणी आहेत.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आयपीएल आधी ‘कॅप्टन कूल’ने केला रॉकस्टार लूक चाहते; म्हणाले, नको रे राहू ‘या’ अभिनेत्यासोबत

-नलूच्या शालूमुळे मालिकेची पोलखोल, ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ मालिकेच्या सीनमध्ये झाली मोठी चूक

-दीपिका कक्करला शोएबच्या घरातील ‘नोकरानी’ म्हणल्याने भडकली अभिनेत्री; म्हणाली, ‘तुमच्या आईलाही असंच बोलता का?’

हे देखील वाचा