Wednesday, June 26, 2024

‘द काश्मीर फाइल्स’ने दुसऱ्याच दिवशी तोडले अनेक रेकॉर्ड, ‘गंगूबाई काठियावाडी’ ते ‘राधे श्याम’वर चित्रपट पडतोय भारी

कोरोना काळात निर्बंध लादल्यानंतर आता चित्रपटगृहे पूर्णपणे उघडली आहेत. ‘गंगुबाई काठियावाडी’पासून ‘द बॅटमॅन’ आणि प्रभासचा ‘राधे श्याम’पर्यंत चांगला व्यवसाय करत आहे. पण, आता या चित्रपटांना विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाइल्स’ने मागे टाकले आहे. चित्रपटाची लोकप्रियता प्रचंड वाढत आहे. सर्वच चित्रपट अतिशय वेगळ्या प्रकारचे असल्याने प्रेक्षकांनाही भरपूर पर्याय मिळत आहेत. या सगळ्यात ‘द काश्मीर फाइल्स’ एक सरप्राईज पॅकेज म्हणून समोर आले आहे.

या चित्रपटाची जास्तीत जास्त प्रसिद्धी तोंडी मिळत आहे. पहिल्या दिवशी हा चित्रपट दीड ते दोन कोटींचा व्यवसाय करेल असा अंदाज होता. पण पहिल्याच दिवशी या चित्रपटाने साडेतीन कोटींची कमाई केली. त्याचवेळी, दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत १३९ टक्क्यांची झेप पाहायला मिळाली, हा एक विक्रम आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्वीट करून सांगितले की, चित्रपटाने शनिवारी (१२ मार्च) ८.५ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत १२.०५ कोटींचा व्यवसाय केला आहे.

चित्रपटाने लक्ष घेतले वेधून
या चित्रपटाने अचानक चित्रपट रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे त्याचे शो आणि स्क्रीन नंबरही वाढवण्यात आले आहेत. प्रेक्षक सकाळी साडेसहा वाजताचा शो देखील बघायला जातात. विशेष म्हणजे चित्रपटाच्या रविवारसाठी (१३ मार्च) जबरदस्त आगाऊ बुकिंगही करण्यात आले आहे. तरण आदर्शने ट्वीटरवर ही माहिती दिली आहे. हा चित्रपट आता आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’, हॉलिवूडचा चित्रपट ‘बॅटमॅन’ आणि प्रभासचा ‘राधे श्याम’ या चित्रपटांवर उतरणार आहे. आगामी काळात हा चित्रपट आणखी चमकदार कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.

हरियाणा- मध्य प्रदेशमध्येही करमुक्त
हरियाणा आणि मध्य प्रदेशमध्येही हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. या चित्रपटात अनुपम खेर (Anupam Kher), मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty), दर्शन कुमार (Darshan Kumar), पल्लवी जोशी (Pallavi Joshi) आणि चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ९० च्या दशकात काश्मिरी पंडित, हिंदूंच्या हत्याकांडाची आणि पलायनाची कथा आहे.

पंतप्रधानांनीही केले कौतुक
चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि निर्माता अभिषेक अगावक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. अभिषेक अग्रवाक यांनी बैठकीनंतर सांगितले की, “काश्मीर नरसंहारादरम्यान काश्मिरी पंडितांच्या पलायनावर चित्रपट बनवण्याचे धैर्य मिळाल्याबद्दल मी धन्य झालो.”

या चित्रपटात काश्मिरी नरसंहाराचे वेदनादायक आणि भावनिक चित्र रेखाटण्यात आले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सांगितले की, ही कथा पडद्यावर आणणे सोपे नव्हते. कारण काश्मिरी पंडितांचे पलायन हा भारतीय राजकारणातील महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांचे डोळे उघडण्याचे काम करणार आहे. त्याने सांगितले की, चित्रपटादरम्यान त्यातील सर्व स्टार्सनी आपापली पात्रे जगली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा :

हे देखील वाचा