चित्रपट निर्माते-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. कधी ते एखाद्या चित्रपटावर तर कधी स्टार आणि फिल्ममेकरवर भाष्य करताना दिसतात. यावेळी त्यांनी करण जोहरच्या लोकप्रिय चॅट शो ‘कॉफी विथ करण’वर निशाणा साधला आहे. नुकत्याच झालेल्या एका संवादादरम्यान त्यांनी या कार्यक्रमावर जोरदार टिका केली आहे तसेच या कार्यक्रमात सहभागी न होण्याचे कारणही स्पष्ट केले आहे.
नुकत्याच झालेल्या एका संवादादरम्यान विवेक अग्निहोत्री म्हणाले की, ते करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये येण्याचा विचार का करू शकत नाही? ते म्हणाले की शोमध्ये जायला आवडणार नाही कारण त्याचे आयुष्य केवळ सेक्सभोवती फिरत नाही. यासोबतच त्यांनी करण जोहरच्या शोलाही बकवास म्हटले. करण जोहरचा हा शो बॉलिवूड स्टार्सच्या आयुष्याशी संबंधित आश्चर्यकारक खुलासे करण्यासाठी ओळखला जातो. या शोमध्ये सेलेब्सच्या पर्सनल लाईफचे अनेक रंजक किस्से समोर आले आहेत, काही सेलेब्सच्या पर्सनल लाईफ आणि सेक्स लाईफबद्दलही बोलले गेले आहे.
अलीकडेच एका मुलाखतीत विवेक अग्निहोत्रीला विचारण्यात आले की, त्यांना शोमध्ये येण्यासाठी आमंत्रित केले आहे का? ते म्हणाले की, “हा सध्या ज्या प्रकारचा शो आहे, त्यामुळे मी तिथे नक्कीच जाणार नाही कारण माझ्याकडे सांगण्यासारखे काही नाही. म्हणजे मी तिथे बोलू शकत नाही, मी आता एक मध्यमवयीन व्यक्ती आहे. मला दोन मुले आहेत. सेक्सही आता माझ्या आयुष्याची प्राथमिकता राहिलेली नाही.”
विवेक अग्निहोत्री पुढे म्हणाले की, “हा शो खूप स्क्रिप्टेड आहे, त्यामुळे तिथे बसून मला खूप विचित्र वाटेल. मी कोणत्याही विषयावर बोलू शकतो, मग तो सेक्स असो किंवा इतर काही विषय. पण, फक्त एका विषयावर लक्ष केंद्रित करायचं, मी खूप आध्यात्मिक आहे, मी लैंगिक-केंद्रित व्यक्ती नाही. मी माझ्या पत्नीसोबत सेक्स लाईफ एन्जॉय करतो. कोण कोणाला सोडून जातंय, कोण कोणासोबत झोपतंय, हे सगळं माझ्या आयुष्यात नाही. “बकवास कार्यक्रम आहे. त्याच्याशी कोणीही संबंध ठेवू शकत नाही.” दरम्यान विवेक अग्निहोत्री त्यांच्या द काश्मिर फाईल्स चित्रपटामुळे चांगलेच जोरदार चर्चेत आले होते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा- मराठी चित्रपटाचा अटकेपार झेंडा! ‘फोर्ब्स’ने घेतली ‘पल्याड’ चित्रपटाची दखल
हिजाब विरोधी वाद पेटला! लोकप्रिय गायिकेने थेट मंचावरचं कापले केस
‘मला फसवण्यात आले आहे…’, राज कुंद्राने लिहले पंतप्रधानांना पत्र, सीबीआय चौकशीची केली मागणी