Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड ‘द काश्मीर फाईल्स’च्या दिग्दर्शकाने थेट सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरच साधला निशाणा; म्हणाले…

‘द काश्मीर फाईल्स’च्या दिग्दर्शकाने थेट सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरच साधला निशाणा; म्हणाले…

यावर्षी मार्च महिन्यात एका सिनेमाने एन्ट्री केली होती. हा सिनेमा प्रदर्शित होताच, सिनेमाने सर्वांचे लक्ष वेधले होते. प्रेक्षक हा सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करत होते. विशेष म्हणजे, कमी बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसव छप्परफाड कमाई केली होती. हा सिनेमा इतर कोणता नसून ‘द काश्मीर फाईल्स‘ हा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले होते. यामधून विवेक यांनी काश्मिरी पंडितांचे 32 वर्षे जुन्या वेदना पडद्यावर दाखवल्या होत्या.

‘द काश्मिर फाईल्स’ (The Kashmir Files) सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर लोकांमध्ये चर्चा रंगली होती की, काश्मिरींचा दोषी कोण आहे? यावर शुक्रवारी (दि. 02 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात 1990मध्ये काश्मिरी पंडितांच्या लक्ष्यित हत्येची एसआयटी चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी झाली. ही याचिका न्यायालयाने फेटाळली. आता न्यायालयाच्या निर्णयावर विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर लगेच विवेक यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट केले. यामध्ये त्यांनी मागणी फेटाळल्याने दु:ख व्यक्त केले. विवेक यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले की, “काश्मीरमधील हिंदू नरसंहारातील पीडितांना न्यायव्यवस्थेने पुन्हा एकदा निराश केले आहे. पुन्हा एकदा काश्मीरमधील हिंदू अल्पसंख्याकांसाठी न्यायाचा अधिकार नाही.” यासोबतच त्यांनी #RightToJustice हा हॅशटॅगही वापरला आहे.

विवेक यांनी यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीपूर्वी एक ट्वीट केले होते. त्यात त्यांनी आजचा दिवस खूपच महत्त्वाचा असल्याचे सांगितले होते. विवेक यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये एका वृत्तसंस्थेची पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या बाजूला काश्मीरचा नकाशा आहे आणि त्या नकाशात ‘द काश्मीर फाईल्स’ लिहिले आहे. यासोबत त्यांनी लिहिले होते की, “आज न्यायव्यवस्थेची ही ऍसिड टेस्ट आहे.”

‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर या सिनेमात अनुपम खेर, चिन्मय मांडलेकर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि मृणाल कुलकर्णी यांसारख्या कलाकारांचा समावेश होता. 15 ते 25 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने तब्बल 300 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कोणी चित्रकार तर कोणी बुद्धिबळपटू, बॉलिवूड कलाकार खेळांमध्येही आहेत आघाडीवर
मुकेश अंबानींच्या गणपती विसर्जनाला पोहचले रणवीर- दीपिका, डान्स पाहून सारेच हैराण
लाडक्या बाप्पाला निरोप देताना भावूक झाले ‘हे’ कलाकार, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

हे देखील वाचा