Tuesday, May 28, 2024

‘या’ महिन्यात ‘श्यामची आई’ चित्रपट होणार प्रदर्शित; साने गुरुजींच्या भूमिकेत दिसणार ‘हा’ कलाकार

मराठीतील प्रसिद्ध लेखक पांडुरंग सदाशिव साने गुरुजी यांच्या ‘श्यामची आई’ या कादंबरीवर आधारित चित्रपटाचे पोस्टर आज प्रदर्शित करण्यात आले. दिग्दर्शक सुजय डहाके यांच्या दिग्दर्शनाखाली येणारा हा चित्रपट यंदा दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. जुन्या ‘श्यामची आई’या चित्रपटाशी काहीही संबंध नाही. हा चित्रपट साने गुरुजींच्या कादंबरीवर आधारीत असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कादंबरीतील बऱ्याच गोष्टीवर या सिनेमाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

पोस्टरमध्ये खोडकर श्याम आणि त्याला मायेने शिस्त लावणारी त्याची आई दिसत आहे. ‘श्यामची आई’ (shyamchi aai)  या चित्रपटात ओम भूतकर यांनी साने गुरुजींची भूमिका साकारली आहे. त्याबरोबरच गौरी देशपांडे, बाल कलाकार शर्व गाडगीळ, संदीप पाठक, सारंग साठ्ये, मयूर मोरे, उर्मिला जगताप, भूषण विकास, सुनिल अभ्यंकर, अक्षया गुरव आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.

‘श्यामची आई’ हा चित्रपट आईच्या प्रेमाची आणि त्यागाची गोष्ट सांगतो. आईचे प्रेम आणि त्याग याची साने गुरुजींनी ‘श्यामची आई’ या कादंबरीतून अत्यंत सुंदरपणे मांडणी केली आहे. या चित्रपटातून हीच कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अमृता अरुण राव निर्मित आणि आलमंड्स क्रिएशन प्रस्तुत ‘श्यामची आई’ या चित्रपटाची संहिता प्रसिद्ध लेखक -दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनी लिहिली आहे. अशोक पत्की यांनी संगीत दिले आहे.

साने गुरुजी यांच्या ‘श्यामची आई’ या कादंबरीवर आधारित चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट कसा असेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. दिग्दर्शक सुजय डहाके यांनी यापूर्वी ‘शाळा’, ‘फुंतरू’, ‘आजोबा’, ‘केसरी’ यांसारखे दर्जेदार चित्रपट दिले आहेत. त्यामुळे ‘श्यामची आई’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी अपेक्षा आहे. (The movie Shyamchi Aai will be released in this month)

आधिक वाचा-
अश्लील डान्स स्टेपमुळे गौतमी पाटील पुन्हा अडचणीत; गुन्हा दाखल होणार?
‘चुपके चुपके’च्या सेटवर जेव्हा हृषिकेश मुखर्जीने अमिताभ आणि धर्मेंद्र काढला होता राग, वाचा मजेशीर किस्सा

हे देखील वाचा