Saturday, July 27, 2024

अश्लील डान्स स्टेपमुळे गौतमी पाटील पुन्हा अडचणीत; गुन्हा दाखल होणार?

नागपुरातील एकता गणेशोत्सव मंडळाने रविवारी नृत्यांगना गौतमी पाटील हिचा लावणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली. यावेळी गर्दी हाटवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. कार्यक्रमाला सुरुवातीला काही ठराविक पाहुणे आणि सदस्य उपस्थित होते. मात्र, लावणी सुरू झाल्यावर गर्दी वाढू लागली. त्यामुळे कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला.

झालं असं की, नृत्यांगना गौतमी पाटीलचा (Gautami Patil)  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी आमदार प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात एकता गणेशोत्सव मंडळाच्यावतीने हिलटॉप परिसरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जागा कमी असल्याने अचान मोठी गर्दी झाली. त्यामुळे तिथे पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण वाढला. तसेच गौतमीच्या लावणीला यावेळी पहिल्यांदाच महिलांची गर्दी तूफान झाली.

तेथील काही लोकांनी मोठा गोंधळ घातला. गर्दीमुळे चेंगराचेंगरीची शक्यता निर्माण झाली होती. तसेच गौतमीने मंचावरून दर्शकांकडे बघून अश्लील हातवारे आणि इशारे केले. या कार्यक्रमात महिला-तरुणीही मोठ्या प्रमाणात हजर होत्या, असे सांगितले जात आहे. त्यामुळे काही एनजीओमधील महिलांनी या प्रकरणी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची बोलले जात आहे.

या घटनेमुळे प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिला ट्रोल केले जात आहे. काहींनी तिला दोष दिला आहे. तर काहींनी पाटील हिचे समर्थनार्थही आवाज उठवला आहे. ते म्हणतात की, पाटील यांना दोष देणे चुकीचे आहे. महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी आयोजकांची आणि पोलिसांची आहे.

गोधळ पाहून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. या घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही. गेल्या काही वर्षांपासून एकता गणेशोत्सव मंडळ वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये अनेकदा वाद झाले आहेत.पण या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (A case will be filed against Gautami Patil again due to obscene dance step)

आधिक वाचा-
रंगीत सुंदर साडीमध्ये खुलले नेहा पेंडसेचे सौंदर्य ; पाहा फोटो
‘मराठी कलाकार एका टेकमध्ये…’ शशांक केतकरच्या ‘त्या’ वक्तव्याची चर्चा, एकदा वाचा

हे देखील वाचा