Monday, July 1, 2024

मुंबईतील वाढत्या प्रदूषणासंदर्भात केतकीने शेअर केलेली पोस्ट चर्चेत; म्हणाली, ‘गांभीर्याने घ्या!’

मराठी कलाविश्वातील कलाकार सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर वाढत्या प्रमाणात बोलत आहेत. क्रिकेट विश्वचषक स्पर्धा असो किंवा राज्यातील राजकारण, कलाकार अशा अनेक विषयांवर आपलं मत मांडत लक्ष वेधून घेत आहेत. मुंबईतील प्रदूषण ही समस्या सध्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासंदर्भात मराठी अभिनेत्री केतकी माटेगावकर यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

केतकी माटेगावकर (ketaki mategaonkar) सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल होतात. तिचे लाखो चाहते आहेत. माटेगावकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून त्यात तिने मुंबईतील प्रदूषणाची गंभीर समस्या मांडली आहे.

पोस्ट करताना केतकी माटेगावकरने लिहिले की, “गांभीर्याने घ्या! गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत सातत्याने प्रचंड वाढ होत आहे. आपल्या परिसरात राहणाऱ्या अनेक लोकांना श्वसनाचे विकार, धुळीची एलर्जी, संसर्गजन्य आजारांचा सामना करावा लागत आहे. मुंबईत सुरू असेलली बांधकामे, इमारतीची कामं करणाऱ्यांनी याकडे विशेष लक्ष देऊन खबरदारी घेणं खूप गरजेचे आहे. जलस्त्रोतांजवळ कोणताही कचरा फेकण्याआधी विचार करा. याकडे गांभीर्याने लक्ष घालण्याची विनंती मी एक जागृत नागरीक म्हणून करत आहे.”

केतकीच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तित्या या मताशी सहमती व्यक्त केली आहे. काही लोकांनी तिला प्रदूषण कमी करण्यासाठी काही उपाययोजना सुचवल्या आहेत. यामुळे समाजात जागरूकता निर्माण होत आहे. तसेच समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मुंबईत सकाळी आणि सायंकाळच्या वेळेला धुरक्याचे प्रमाण खूप असते. अशावेळी घराबाहेर किंवा गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावे, असे काही लोकांनी सांगितले आहे.

मराठी अभिनेत्री केतकी माटेगावकर ही एक प्रतिभावान आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यापासूनच तिने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘अंकुश’ चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटात तिच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. माटेगावकरने 2012 मध्ये ‘शाळा’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी खूप पसंत केले. त्यानंतर तिने ‘टाइमपास’ चित्रपटांमध्ये काम केले आहे. (The post shared by Ketaki Mategavarkar regarding the increasing pollution in Mumbai is in discussion)

आधिक वाचा-
अनुष्का शर्मा पुर्वी ‘या’ अभिनेत्रीला विराट कोहलीने केले होते डेट, जाणून घ्या एका क्लीकवर
विराट कोहली जेव्हा अनुष्का शर्मासाठी सार्वजनिक ठिकाणी पोहोचला होता बेकरीत, तेव्हा घडलं असं काही

हे देखील वाचा