आपल्या सुंदरतेने तरुणाईला वेड लावणारी ‘केतकी माटेगावकर’, ‘या’ चित्रपटातून केली होती अभिनयाची सुरुवात

Marathi Actress And Singer Ketaki Mategaonkar Birthday Special Know Facts


आपल्या अभिनयाने घराघरात पोहोचलेली आणि आपल्या सुंदरतेने तरुणाईला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजेच ‘केतकी माटेगावकर’. तिने आपल्या गोड आवाजाने सर्वांच्या हृदयात जागा बनवली आहे. केतकीचा लोभसवाणा चेहरा पाहून कुणीही तिच्या प्रेमात पडेल. नुकताच काही दिवसांपूर्वी तिने आपला आपला २७ वा वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या कारकीर्दीवर टाकलेली एक नजर…

उत्तम गायिका
केतकीचा जन्म २२ फेब्रुवारी, १९९४ रोजी नागपूर येथे झाला होता. तिचे वडील पराग माटेगावकर संगीत दिग्दर्शक आणि आई सुवर्णा माटेगावकर गायिका आहेत. तिला आपल्या पालकांकडून वयाच्या तिसऱ्या वर्षापासून गायनाचे धडे मिळत होते. त्यावेळीच तिची संगीताबद्दलची आवड आणि स्पार्क स्पष्ट झाला होता. ऑडिओ सीडीसाठी तिचे पहिले स्टुडिओ रेकॉर्डिंग वयाच्या ६ व्या वर्षी झाले होते. त्यानंतर केतकीने पुन्हा कधीच मागे वळून पाहिले नाही.

तिने कमी वयात लाईव्ह कॉन्सर्ट आणि स्टुडिओ रेकॉर्डिंग सादर करण्यास सुरुवात केली. यादरम्यान तिने शास्त्रीय संगीताचा मजबूत पाया निर्माण करण्यासाठीही अथक प्रयत्न केले.

केतकीच्या कष्टाने तिला प्लेबॅक सिंगर म्हणून स्थापित करण्यास मदत केली आहे. केतकीने इंडस्ट्रीतील अनेक आघाडीच्या अभिनेत्रींना आपला आवाज दिला आहे.

या चित्रपटांसाठी दिला आवाज
केतकीने अनेक चित्रपट आणि मालिकेसाठी आवाज दिला आहे. त्यामध्ये ‘बाल गणेश’, ‘तानी’, ‘टाईमपास २’, ‘वाय झेड’ आणि ‘फोटोकॉपी’, ‘प्रेम हे’, ‘आनंदी गोपाळ’ आणि ‘पांघरून’ यांचा समावेश आहे.

शाळा चित्रपटातून केली अभिनयाची सुरुवात
गायिकासोबतच केतकी अभिनयातही उत्तम आहे. केतकीने २०१२ साली उमेश ढाके यांच्या ‘शाळा’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली. हा चित्रपट इतका गाजला की, केतकीने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले होते. तिच्या या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरवण्यात आले. यासोबतच केतकीला २०१२ साली ‘काकस्पर्श’ या चित्रपटातील भूमिकेसाठी इंटरनॅशनल फिल्म ॲण्ड थिएटरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला होता. याव्यतिरिक्त टाईमपास’मधील प्राजूच्या भूमिकेमुळेदेखील ती घराघरात पोहोचली.

मिळाली होती बालिका वधूमध्ये काम करण्याची ऑफर
केतकीच्या अभिनयामुळे तिला ‘बालिका वधू’ या मालिकेत काम करण्याची ऑफर मिळाली होती. परंतु तिने ही ऑफर नाकारली.

केतकी ‘डान्स प्लस ४’ मध्येही गेस्ट म्हणून दिसली होती.

सोशल मीडियावर फोटो करते शेअर
इतर अभिनेत्रींप्रमाणे केतकीही सोशल मीडियावर सक्रिय आहे. ती नेहमी आपले फोटो शेअर करत असते. तिने नुकतेच काही फोटो शेअर केले, जे चाहत्यांना खूप आवडले आहेत.

या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

या चित्रपटांमध्ये केले काम
मराठमोळ्या केतकीने एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने ‘काकस्पर्श’ (२०१२), ‘आरोही गोष्ट तिघांची’ (२०१२), ‘तानी’ (२०१३), ‘टाईमपास’ (२०१४), ‘टाईमपास २’ (२०१५) आणि ‘फुंतरू’ (२०१६) या चित्रपटामध्ये झळकली आहे.

तिने ‘तानी’ या चित्रपटामुळेही सर्वांच्या मनात आपली जागा बनवली.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-संस्कृतीची बातच न्यारी! पुण्याच्या मराठमोळ्या अभिनेत्रीचे साडीतील फोटो व्हायरल; पाहून तुम्हीही पडाल प्रेमात


Leave A Reply

Your email address will not be published.