Wednesday, July 3, 2024

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने अमिताभ यांच्यासोबत काम करण्यास 18 वर्षे दिला होता नकार; कारणही तितकंच रोचक!

महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कारकीर्दीत बर्‍याच उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि अजूनही करत आहे. बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांनी बिग बींसोबत काम केले आहे. याव्यतिरिक्त, बिग बींसोबत काम करणे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते, पण एक अभिनेता असाही आहे, ज्याने अमिताभबरोबर तब्बल 18 वर्षे काम केले नाही. त्यांचे नाव डॅनी डेन्झोंगपा असे आहे.

डॅनी आणि अमिताभ यांच्यात कोणताही वाद नव्हता किंवा शत्रुत्व नव्हते. खरं तर, जेव्हा जेव्हा डॅनीला अमिताभजी सोबत चित्रपटाची ऑफर दिली जायची, तेव्हा त्यांना वाटायचे की बिग बींसमोर त्यांचे व्यक्तिमत्व ढासळेल. त्यांचा एखादा एकत्रित चित्रपट हिट ठरला, तर त्याचे संपूर्ण श्रेय अमिताभ यांना मिळेल, अशी डॅनी यांची समज होती. त्यावेळी अमिताभ बच्चन सुपरस्टार झाले होते आणि त्यांचे नावही मोठे गाजलेले होते. हे प्रकरण 18 वर्षे चालू राहिले. डॅनी यांना अमिताभजी बरोबर चित्रपटाच्या ऑफर मिळत राहिल्या आणि त्यांनी त्या नाकारल्या.

अखेर 18 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर, डॅनी यांनी मुकुल आनंद दिग्दर्शित ‘हम’ चित्रपटासाठी होकार दिला. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि डॅनी डेन्झोंगपा यांच्याशिवाय गोविंदा, रजनीकांत, अन्नू कपूर, कादर खान, अनुपम खेर, किमी काटकर या मोठ्या कलाकारांनीही महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

सन 1991 मध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होता. यामुळे चित्रपटाला ‘ब्लॉकबस्टर’ ही पदवी देण्यात आली. तर 1992 साली बिग बींनी चित्रपटातील अभिनयासाठी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही जिंकला. या चित्रपटातील जवळपास सर्वच गाणे जबरदस्त हिट झाले. तसेच ‘जुम्मा चुम्मा दे दे’ या गाण्यासाठी फिल्मफेअर पुरस्कारही देण्यात आला होता.

हे देखील वाचा