Monday, July 1, 2024

नुसता राडा! टायगर श्रॉफने वर्कआऊट व्हिडिओ केला शेअर; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘असाच फिटनेस पाहिजे’

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या फिटनेसबाबत नेहमीच चर्चेत असतो. तसेच तो त्याच्या फिटनेसबाबत खूप सावधही राहत असतो. त्याला जिममध्ये जायला आणि त्याच्या फिजिकवर काम करायला प्रचंड आवडते. तो सोशल मीडियावर देखील सतत सक्रिय असतो. तो अनेकदा त्याच्या वर्कआउट आणि स्टंट सरावाचे व्हिडिओ शेअर करतो. त्याने नुकतेच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तो जिममध्ये वेट लिफ्टिंग करताना दिसत आहे.

टायगर या व्हिडिओमध्ये पुल-अप करताना दिसत आहे. यामध्ये तो बॉक्सिंगचे हातमोजे घालून सराव देखील करत आहे. त्याने काळ्या रंगाची पँट आणि काळ्या रंगाचा टी परिधान केला आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला कॅनेडियन गायकाचे ‘अर्न्ड इट’ हे गाणे वाजत आहे. हॉलिवूड चित्रपट ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ चे हे सुपरहिट गाणे आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिले, “राइज एंड ग्रिंड.”

या वर्षाच्या सुरुवातीला, ‘गणपत’च्या निर्मात्यांनी या चित्रपटातील टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन या दोघांचे लूक शेअर केले. अलीकडेच, चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा करताना, टायगर श्रॉफने इंस्टाग्रामवर चित्रपटाचा एक नवीन टिझर शेअर केला. त्याने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “जर त्याची हटेल तर, सर्वांचीच फाटेल. गणपत तयार रहा!” २३ डिसेंबर २०२२ रोजी चित्रपटगृहांमध्ये विकास बहल ‘गणपत’ चे दिग्दर्शन करत आहेत. याची निर्मिती वासू भगनानी, विकास बहल, दीपशिखा देशमुख आणि जॅकी भगनानी यांनी केली आहे.

टायगर श्रॉफ शेवटचा ‘बागी 3’ मध्ये दिसला होता. हा चित्रपट सुपरहिट झाला होता. यात रितेश देशमुख, श्रद्धा कपूर आणि अंकिता लोखंडे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. टायगर सध्या त्याच्या आगामी ‘हिरोपंती २’ या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात त्याच्या विरुद्ध भूमिकेत अभिनेत्री तारा सुतारिया असणार आहे. अहमद खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. टायगर अहमद खानच्या ‘बागी ४’ मध्ये देखील दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी स्वत:ला स्टारकिड मानत नाही’; अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे मोठे वक्तव्य

-‘इंडियन आयडल १२’च्या ग्रँड फिनालेने टेलिव्हिजन विश्वात नोंदवला ‘हा’ खास विक्रम; टीमने आनंद साजरा केला

-‘बिग बीं’च्या सुरक्षेत तैनात हेड कॉन्स्टेबलची झाली बदली; पगाराची माहिती मिळताच बॉडीगार्डविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश

हे देखील वाचा