Monday, June 9, 2025
Home टेलिव्हिजन ‘भाड़ में जाएं लोग’, शिल्पा शेट्टी आणि जॅकलीन फर्नांडिसने आपापल्या कॉन्ट्रोवर्सीवर दिल्या प्रतिक्रिया

‘भाड़ में जाएं लोग’, शिल्पा शेट्टी आणि जॅकलीन फर्नांडिसने आपापल्या कॉन्ट्रोवर्सीवर दिल्या प्रतिक्रिया

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्यासाठी २०२०-२१ वर्ष खूपच कटू आठवणी देणारे ठरले होते. कारण शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अश्लिल चित्रफित प्रकरणात अटक झाली होती. यावेळी तो अनेक महिने तुरूंगात होता, ज्यामुळे शिल्पा शेट्टीलाही मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. त्याचबरोबर अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसही कथित बॉयफ्रेंड सुकेश चंद्रशेखरमुळे चर्चेत आली होती. आता याच मुद्द्यावर दोघींनी केलेले विधान आता चर्चेत आहे. काय आहे हे सगळे संपुर्ण प्रकरण चला जाणून घेऊ.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (shilpa shetty) ‘शेप ऑफ यू’ हा कार्यक्रम सध्या सगळीकडे चर्चेत आला आहे. या कार्यक्रमात ती मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांना प्रमुख पाहूणे म्हणून बोलावणार असून, या कलाकारांच्या आयुष्याबद्दल अनेक रंजक गोष्टी आणि घटना ती विचारणार आहे. सध्या या कार्यक्रमाच्या प्रोमोचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये शिल्पा शेट्टी आणि जॅकलीन फर्नांडिस (jacqueline fernandez) मनमोकळ्या गप्पा मारताना दिसत आहेत. यामध्ये दोघीही एकमेकांना खुणावत इशाऱ्याने बोलताना दिसत आहेत. यामध्ये त्यांच्या आधीच्या गाजलेल्या प्रकरणांचीही चर्चा सुरू आहे. यामध्ये सगळ्यात शेवटी शिल्पा शेट्टी “वाद होऊ नाहीतर ना होऊ, लोकांचा विचार नाही करायचा. आपलं आयुष्य आहे, आपण जगायचं” असं म्हणताना दिसत आहे.

हा प्रोमो शेअर करत शिल्पा शेट्टीने लिहीले आहे की, “मी खूप भूमिका केल्या आहेत मात्र या भूमिकेमुळे मी खूप आनंदी आहे. मी या माध्यमातून माझे शब्द व्यक्त करत राहीन, यासाठी याच्यापेक्षा सुंदर माध्यम कोणतेच नसेल. चित्रपटांसह यामध्ये खूप मजेशीर गप्पा ऐकायला मिळतील. माझ्या कलाकार मित्रांसोबत फिटनेसबद्दल आणि अनेक सकारात्मक चर्चा होणार आहेत. तुम्हीही तयार आहात ना.” समोर आलेल्या प्रोमोवरून हा कार्यक्रम चांगलाच गाजणार असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा –

हे देखील वाचा