‘पहला नशा’ या गाण्याने साधना सरगम यांना मिळाली मोठी संधी, वाचा त्यांची कहाणी

काही गाणी, चित्रपट कितीही जुनी झाली तरी त्यांची लोकप्रियता कधीच कमी होत नसते. ‘पहला नशा’ हे गाणेही याच यादीत मोडते. हे गाणे येऊन बराच काळ लोटला तरीही या गाण्याची लोकप्रियता काही कमी झालेली नाही. याच गाण्याने गायिका साधना सरगम यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. या गाण्यासोबतच त्यांनी हिदी चित्रपट क्षेत्रात अनेक सुपरहीट गाणी गायली. जी आजही लोकप्रिय आहेत. आज ( ७ मार्च) साधना सरगम यांचा वाढदिवस, जाणून घेऊ या त्यांच्याबद्दल.

९०च्या दशकातील प्रसिद्ध गायिका म्हणून साधना सरगम (Sadhana Sargam) यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. आपल्या जादूई आवाजाने त्यांनी अनेक दर्जेदार गाणी गायली आहेत. त्यांची अनेक गाणी आजही लोकप्रिय आहेत. साधना सरगम यांचा जन्म ७ मार्च १९७४ ला रत्नीगिरीमध्ये झाला. त्यांचे खरे नाव साधना पुरूषोत्तम घाणेकर असे आहे. त्यांना घरातुनच संगीताचे बाळकडू मिळाले होते. त्यांनी वयाच्या चौथ्या वर्षापासूनच गायनाचे धडे गायला सुरूवात केली होती. लहानपणापासूनच त्यांना गायन क्षेत्रात करिअर करायचे होते. साधना सरगम यांनी आमिर खान, आणि आयशा झुल्का यांच्या जो जीता वही सिकंदर या चित्रपटात गायलेले पहला नशा हे गाणे प्रचंड गाजले होते. याच गाण्यातुन त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. पहला नशा या गाण्याात साधना सरगम यांच्यासोबत उदित नारायण यांनी साथ दिली होती. याआधी त्यांनी आपल्या जादूई आवाजात अनेक गाणी गायली होती मात्र त्यांचे हे गाणे प्रेक्षकांनी प्रचंड डोक्यावर घेतले होते.

दमदार आवाजाची मोहिनी लाभलेल्या साधना सरगम यांनी चार दशके संगीत क्षेत्रात आपले अमुल्य योगदान दिले आहे. त्यांनी तब्बल १५४६ चित्रपटात २००० गाणी गायली आहेत. इतकेच नव्हेतर त्या अशा पहिल्या गायिका आहेत ज्यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी अनेक मानाचे पुरस्कार दिले गेले आहेत. साधना सरगम यांनी हिंदी, तामिळ, मराठी, तेलुगू, बांग्लादेशी, कन्नड, अशा अनेक भाषांंमध्ये गाणी गायली आहेत. समोर आलेल्या बातम्यानुसार त्यांनी आपल्या आयुष्यात एकूण १५ हजार गाणी गायली आहेत.

Latest Post