Saturday, June 29, 2024

‘आली आली गं भागाबाई’गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ दिवशी होणार रिलीज

एखाद्या गीताची जादूअथवा लोकप्रियता चित्रपटाला एक वेगळी ओळख निर्माण करून देत असते. अनेक चित्रपट एखाद्या हिट गाण्यांमुळे ओळखले जात  असल्याचे आपण बघतो. असंच  एक जोरदार गीत आगामी ‘एकदा येऊन तर बघा’ या धमाल  चित्रपटातून आपल्या  भेटीला आलं आहे.  

प्रसाद खांडेकर दिग्दर्शित‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात ‘आली आली गं भागाबाई’ (Aali Aali Gan Bhagabai) हे पारंपरिक गीत नव्या ढंगात सादरकेलं आहे. नुकतंच हे गीत प्रदर्शित झालं असून या गीतालाप्रेक्षक पसंतीची पावती मिळाली आहे.  हे गीतरोहन प्रधान यांनी गायलं आहे. मंदार चोळकर यांच्या गीतलेखनाला रोहन-रोहनयांचं संगीत लाभलं आहे.  या गीतातून  चित्रपटातील सर्व कलाकारांचा ढिंच्याक अंदाजपहायला मिळतोय.

या गीताची आणि चित्रपटाच्या कथेची गंमत चित्रपट पाहिल्यानंतरचउलगडेल. चित्रपटाच्या गीताचे हक्क सारेगम कडे आहेत. 24 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदायेऊन तर बघा’या चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमारमोहंती,दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपकपेंटर यांचीअसून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायणमूरथी, डॉ.झारा खादर यांची आहे.

गिरीश कुलकर्णी,सयाजी शिंदे, भाऊ कदम, विशाखा सुभेदार,  तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने,प्रसादखांडेकर,  राजेंद्रशिसातकर,  नम्रतासंभेराव, वनिता खरात, शशिकांत केरकर,रोहित माने,सुशील इनामदार आदि चित्रपटसृष्टीती लकसलेल्या कलाकारांची भली मोठी फौज या चित्रपटात आहे. लेखक अभिनेता प्रसाद खांडेकर ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या निमित्तानेदिग्दर्शकीय पदार्पण करीत आहे. (The traditional song Aali Aali Gan Bhagabai was featured in the movie Ekda Eyam Tar Bagha directed by Prasad Khandekar.)

आधिक वाचा-
राजकीय भेटीगाठी वाढल्यामुळे प्राजक्ता माळीवर चाहते नाराज; म्हणाले, ‘तुला अनफॉलो…’
‘अरबाजनेच तिला…’, मलायकाच्या मांडीवर ‘तो’ निशाणा पाहून चाहत्याची लक्ष वेधी कमेंट; पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा