Friday, July 5, 2024

‘इंदिरा इज इंडिया …’, कंगना रणौतच्या ‘इमरजेंसी’चा जबरदस्त टीजर रिलीज, ‘या’ दिवशी प्रदर्शित हाेणार चित्रपट

कंगना रणाैतचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘इमर्जन्सी‘ ची रिलीज डेट समोर आली आहे. कंगनाने या चित्रपटाचा टीझर शेअर केला आणि सांगितले की, हा चित्रपट यावर्षी 24 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. याआधी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ऑक्टोबरमध्ये ठेवण्यात आली होती. मात्र, आता तो नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

1 मिनिट 12 सेकंदाचा हा टीझर कंगणाने (kangana ranaut) तिच्या अधिकृत इंस्टग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा चित्रपट या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे, जाे हिंदीत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कंगना रणाैतने केले असून पटकथा रितेश शाहने लिहिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

टीझरची सुरुवात 25 जून 1975 या तारखेपासून होते, ज्या दिवशी देशात इमर्जन्सी लागू करण्यात आली होती. यानंतर अशांततेचे दृश्य समोर येते. वृत्तपत्राची एक हेडलाईन दिसते, ज्यावर असे लिहिले आहे की, देशात इमर्जन्सी लागू करण्यात आली आहे. त्यानंतर अनुपम खेर यांचीही एक झलक दिसते, ज्यामध्ये ते तुरुंगात असल्याचे दिसत आहेत. लोक रस्त्यावर उतरले आहेत, पोलीस दडपशाहीचे धोरण अवलंबत आहेत, गोळ्या झाडत आहेत. मग इंदिरा गांधींचा शक्तिशाली आवाज येतो, ‘इंदिरा इज इंडिया अँड इंडिया इज इंदिरा.’

‘इमर्जन्सी’ हा भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रवासावर चित्रीत आहे. 1975मध्ये घडलेल्या घटनांना त्यांनी कसे तोंड दिले, ज्याने भारताचा इतिहास बदलला, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या देशाच्या तिसऱ्या पंतप्रधान होत्या आणि आजपर्यंत पंतप्रधान बनणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत.( the trailer of kangana ranaut emergency came out emergency release on 24 november on cinemas )

अधिक वाचा- 
सीझेन खानसोबतच्या डेटिंगच्या बातम्यांवर श्वेता तिवारीची प्रतिक्रिया, म्हणाली,’मी त्याला…’
आमिर खानसोबत पदार्पण करूनही नाही मिळालं यश, कपिल शर्माची ‘ऑनस्क्रीन’ पत्नी बनत सुमोनाने कमावलं नाव

हे देखील वाचा