Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार शाहरुख खानच्या ‘जवान’चा ट्रेलर, अभिनेत्याने केला खुलासा

प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार शाहरुख खानच्या ‘जवान’चा ट्रेलर, अभिनेत्याने केला खुलासा

शाहरूख खानचा चाहता वर्ग भारतात नाही, तर परदेशात देखील मोठा आहे. शाहरूखची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते काहीही करण्यास तयार असता. शाहरूखचा काही दिवसांपूर्वी ‘पठाण‘ चित्रपट रिलिझ झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतले होते. या चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर अगदी भक्कम कमाई केली. सध्या बाॅक्स ऑफिसवर ‘गदर 2′ चित्रपटाची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. अशाच आता शाहरूखचे चाहते त्याच्या अगामी ‘जवान’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहरूखच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

शाहरूख खानचा (shahrukh khan)  बहुप्रतिक्षित ‘जवान’ या चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. या महिन्यात या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. ‘जवान’च्या ट्रेलरची रिलीज डेट 31 ऑगस्ट 2023 निश्चित करण्यात आली आहे. याचा खुलासा खुद्द किंग खानने केला आहे. त्यामुळे आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटाला शाहरूख येणार आहे.

शाहरुखने एक पोस्ट शेअर केली आहे.पोस्ट शेअर करताना त्याने लिहिले की,”जवानचा आनंद मी तुमच्यासोबत साजरा करणार नाही, असं होऊच कसं शकतं… मी येतोय, 31 ऑगस्टला रात्री 9 वाजता बुर्ज खलिफावर.. जवानचा आनंद साजरा करूया. आणि या जगात प्रेम सगळ्यात सुंदर आणि महत्त्वाची गोष्ट आहे. प्रेमाचा रंग लाल आहे. तर, या दिवशी सगळ्यांनी लाल कपडे परिधान केले तर… काय म्हणता? तयार राहा…”

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

दरम्यान, चित्रपट निर्मात्यांनी परदेशात ‘जवान’चे ऍडव्हानस बुकिंग सुरू केले आहे. यूएसए, ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया आणि जर्मनीसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय केंद्रांमध्ये चित्रपटाची तिकिटे दररोज विकली जात आहेत. अमेरिकेत 450 ठिकाणी ऍडव्हानस बुकिंग करून सुमारे 2 कोटींची कमाई केली. (The trailer of Shah Rukh Khan will be Jawan released on August 30)

अधिक वाचा- 
जॅकलिन फर्नांडिसच्या लेटेस्ट फोटोशूटने वाढवले सोशल मीडियाचे तापमान, फोटो तुफान व्हायरल
भारतातच नाही, तर ‘गदर 2’चा डंका जगभरात; 18 दिवसांनंतर केली ‘छप्परफाड’ कमाई

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा