Thursday, September 28, 2023

‘मुलीला कसं पटवायचं?’, चाहत्याच्या प्रश्नावर शाहरूखने दिले लक्षवेधी प्रत्युत्तर, म्हणाला, ‘पहिल्यांदा तू…’

बॉलिवूडवर खऱ्या अर्थाने कुणी राज्य करत असेल तर ते नाव म्हणजे शाहरुख खान होय. किंग खान, बादशाह इत्यादी बिरुदावली मिरवणाऱ्या शाहरुखवर लाखो तरुणी आजही घायाळ होतात. विशेष म्हणजे शाहरुखने बॉलिवूडमधील त्याचं आत्ताच हे स्थान स्वकष्टाने मिळवलं. त्याचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. शाहरुखचे चाहते देशातच नाही तर परदेशात ही आहेत. तो गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे.

शाहरुख (Shahrukh Khan) त्याच्या ‘जवान‘ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. या चित्रपटातील त्याचा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या दरम्यान शाहरुख एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आला आहे. नुकतचं शाहरुखने चाहत्यांसाठी ट्वीटरवर ‘‘आस्क एसआरके’ (#AskSRK)सेशन घेतले होत. यावेळी शाहरुखच्या एका चाहत्याने त्याला प्रेमविषयी काही टिप्स विचारल्या आहेत. त्यावर शाहरुखने न लाजता उत्तर दिलं आहे. जे सध्या चांगलच चर्चेत आले आहे.

चाहत्याने शाहरुखला विचारले की, मुलीला कसं इम्प्रेस करायचं? ‘सर, एखाद्या मुलीला कसं पटवायचं. काहीतरी टीप्स द्या.’ चाहत्याच्या या प्रश्नावर शाहरुख नाराज झाला होता. त काही वेळानंतर तो म्हणाला की, “पहिल्यांदा पटवायचं वगैरे असं बोलू नकोस. ते योग्य वाटतं नाही.” शाहरुखने चाहत्याला असे सडेतोड उत्तर देण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा किंग खान आपल्या उत्तरामुळे चर्चेचा विषय बनला आहे.

दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला शाहरुख खानने ‘पठाण’ चित्रपटाद्वारे तब्बल 4 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. अभिनेत्याचा ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक व्यवसायासाठी चर्चेत राहिला. शाहरुखच्या चित्रपट कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट देखील ठरला. यानंतर आता प्रत्येकजण ‘जवान’ या चित्रपटाची वाट पाहत आहे. 7 सप्टेंबर 2023 रोजी प्रेक्षकांना ‘जवान’मध्ये शाहरुखची झलक पाहायला मिळनार आहे. (bollywood jawan starrer actor shahrukh khan amazing replied to fan on question of making girlfriend)

अधिक वाचा- 
धक्कादायक! चारू असोपा देखील घेतला होता कास्टिंग काऊचचा विदारक अनुभव; म्हणाली…
परी म्हणू की सुंदरा! सनीच्या मादक अदांवर चाहते फिदा, फोटो पाहाच

हे देखील वाचा