Saturday, June 29, 2024

सुखद धक्का! मनोरंजनविश्वातील ‘या’ खलनायकाने चक्क साठीत बांधली दुसऱ्यांदा लगीन गाठ

अनेक चित्रपटांमध्ये खलनायकी भूमिकांसाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणून आशिष विद्यार्थी यांना ओळखले जाते. त्यांच्या चित्रपटाची आणि त्यातील अभिनयाची सतत चर्चा होत असते. ते सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. सध्या ते वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहेत. काय आहे ते कारण, चला तर जाणून घेऊयात…

आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi) हे वयाच्या 60व्या वर्षी दुसऱ्यांदा विवाह बंधनात आडकले आहेत. आशिष विद्यार्थ्याचे लग्न आसाममधील रुपाली बरुआशी (Rupali Barua) झाले आहे. दोघांनी कोर्ट मॅरेज केले आहे. त्याच्या पोस्टवर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षावही सुरू झाला आहे. आशिष विद्यार्थी यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जे पाहून चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर चाहते भन्नाट कमेंट करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आशिष यांनी लग्नानंतर सांगितले की, आयुष्याच्या या टप्प्यावर रुपालीशी लग्न करल असे वाटत नव्हते. रुपालीच्या भेटीबाबत आशिष म्हणाले की, ही खूप मोठी गोष्ट आहे. भेट कशी झाली ते नंतर सांगेल. ते म्हणाले, आम्ही भेटलो आणि नातं पुढे नेण्याचा निर्णय घेतला. पण आम्हा दोघांची इच्छा होती की, लग्नात फार दंगा मस्ती नको, फक्त कुटुंब असल पाहिजे.

आशिष यांनी दुसरे लग्न अतिशय साध्या पद्धतीने केले आहे. कुटुंबातील सदस्य आणि काही जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत त्यांनी कोर्ट मॅरेज केल आहे. आशिष विद्यार्थीसोबत लग्न केल्यानंतर रुपाली बरुआ म्हणाली की, तो एक सुंदर व्यक्ती आहे आणि त्याच्यासोबत राहणे छान वाटते.

आशिष आणि रुपालीने कोलकाता येथे कोर्ट मॅरेज केले आहे. ज्यामध्ये जास्त लोकांचा समावेश नव्हता. आशिष लवकरच एक रिसेप्शन पार्टी आयोजित करणार आहे. त्यावेळी तो नातेवाईक आणि मित्रांना आमंत्रित करेल. त्याचे पहिले लग्न प्रसिद्ध अभिनेत्री शकुंतला बरुआ यांची मुलगी राजोशी बरुआसोबत झाले होते. (The villain Ashish Vidyarthi told the story of another marriage)

 

हे देखील वाचा