Saturday, June 15, 2024

‘मन झालं बाजिंद’ फेम अभिनेत्रीच्या पतीचे निधन, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती

झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका म्हणजे ‘मन झाले बाजिंद’. आज जरी ही मालिका चालू नसली तरी या मालिकेने अनेक कलाकार समोर आले आणि प्रसिद्ध झाले. प्रेक्षकांचा निरोप घेऊन मालिकेला बराच काळ झाला असला, तरी या मालिकेचे गारुड अजूनही प्रेक्षकांच्या मनावर आहे. यातील कलाकार देखील अजूनही प्रेक्षकांना लक्षात आहेत. या मालिकेमुळे लाइमलाईट्मधे आलेली आणि अमाप प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री म्हणजे कल्पना सारंग.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kalpana Sarang (@kalpana.sarang)


आपल्या अभिनयाने आणि दमदार आवाजाने स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या कल्पना सारंग यांच्याबद्दल एक दुःखद बातमी समोर येत आहे. मन झाले बाजिंद या मालिकेत फुई आजीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कल्पना सारंग यांच्या पतीचे नुकतेच निधन झाले आहे. कल्पना सारंग यांचे पती रमेश सारंग यांचे नुकतेच १२ मे रोजी निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. नुकतेच त्यांचे सर्व विधी पार पाडले. त्यानंतर कल्पना यांनी ही माहिती सोशल मीडियावरुन आपल्या चाहत्यांना दिली. त्यांच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्यावर कमेंट्स करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दरम्यान कल्पना सारंग यांनी मराठीसोबतच अनेक हिंदी मालिका आणि चित्रपटांध्ये काम केले आहे. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी भाषांमधील नाटकांमध्ये देखील काम केले आहेत. अनेक जाहिरातींमध्ये देखील झळकल्या. रायजिंग स्टार या रिऍलिटी शोच्या प्रोमोच्या निमित्ताने त्यांना रणवीर सिंग सोबत त्यांना काम करण्याची संधी मिळाली होती. शॉर्टफिल्म, आगरी सिंघम आणि डॅम्बिस म्हातारी, झी मराठीवरील भागो मोहन प्यारे, द परफेक्शनिस्ट, इन्स्पेक्टर चिंगमसध्या त्या कलर्स मराठीवरील शेतकरीच नवरा हवा या मालिकेत सयाची आजी पारु अक्काची भूमिका साकारत आहेत.

हे देखील वाचा