Saturday, June 29, 2024

प्रतिक्षा संपली! मनोज वाजपेयीच्या ‘फॅमिली मॅन ३’ चा थरार पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा एक धमाकेदार वेबसिरीज प्रेक्षकांंच्या भेटीला येत आहेत. थरार, रोमान्स, आणि धडाकेबाज एक्शन सीनमुळे या वेबसिरीज प्रेक्षकांमध्ये जोरदार लोकप्रिय ठरताना दिसत आहेत. त्यामुळेच अशा वेबसिरीजची प्रेक्षकांनाही जोरदार उत्सुकता लागलेली पाहायला मिळते. यामधील अनेक वेबसिरीजच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या सिझनची चाहत्यांना आतुरता लागली आहे. अशीच गाजलेली वेबसिरीज म्हणजे अभिनेते मनोज वाजपेयींची  फॅमिली मॅन ३. दोन सिझन तुफान सुपरहीट ठरल्यानंतर प्रेक्षकांना या सिरीजच्या तिसऱ्या सीझनची जोरदार उत्सुकता लागली आहे. आता या बद्दलची महत्वाची माहिती समोर आली आहे. 

लोकप्रिय अभिनेते मनोज वाजपेयी यांची द फॅमिली मॅन वेबसिरीज प्रचंड गाजली होती. या सिरीजची अंगावर काटा आणणारी थरारक कथा आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळाला होता. या सिरीजचा पहिला सिझन तर गाजलाच त्याचबरोबर फॅमिली मॅन २ लाही प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळाला. दाक्षिणात्य अभिनेत्री समंथाच्या धमाकेदार अभिनयाची सर्वत्र चर्चा झाली. दोन सिझन सुपरहीट ठरल्यानंतर आता प्रेक्षकांना सिरीजच्या तिसऱ्या सिझनची उत्सुकता लागली होती, जी आता लवकरच संपणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या शेवटी फॅमिली मॅन ३ चा थरार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या महिन्यात नोव्हेंबर महिन्यात ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बातमीने आता चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सिरीजमध्ये मनोज वाजपेयी, शरद केळकर यांच्या भूमिकांनी प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन केले होते. एका गुप्तहेर खात्यामधील अधिकाऱ्याच्या आयुष्याचा थरारक प्रवास या सिरीजमध्ये रेखाटण्यात आला होता. शेवटपर्यंत उत्कंठा वाढवणाऱ्या या सिरीजने प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन केले होते.

हेही वाचा- ‘कॅन्सर सर्व्हायव्हर’ छवी मित्तलला ट्रोल करणं नेटकऱ्यांना पडलं महागात, अभिनेत्रीने थेट…

चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर अक्षय कुमारने घेतला राजकारणात येण्याचा निर्णय, म्हणाला ‘सामाजिक मुद्द्यांवर लक्ष देणार’

ठरल तर! दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ‘या’ दिग्गज अभिनेत्यासोबत करणार बॉलिवूड पदार्पण

हे देखील वाचा