Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’चा ट्रेलर; अभिनेत्याने स्वत: दिली माहिती

‘या’ दिवशी प्रदर्शित होणार अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’चा ट्रेलर; अभिनेत्याने स्वत: दिली माहिती

कोरोना महामारीमुळे बॉलिवूडमधील अनेक चित्रपट प्रदर्शित झाले नाही, तर बरेच चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. यातच अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘बेल बॉटम’ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच हा चित्रपट १९ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे, अशी बातमी आली होती. अशातच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना पाहण्यास मिळणार आहे. परंतु ट्रेलर कधी प्रदर्शित होणार आहे, याची माहिती कोणालाच नव्हती. पण अक्षय कुमारने सोमवारी (२ ऑगस्ट) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.

अक्षय कुमारने इंस्टाग्रामवर या चित्रपटाचा नवीन पोस्टर शेअर केला आहे. यासोबत त्याने सांगितले आहे की, या चित्रपटाचा ट्रेलर ३ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. अक्षयने शेअर केलेल्या या पोस्टनंतर त्याचे चाहते खूप उत्सुक झाले आहेत. मागील अनेक दिवसापासून या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्याच्या बातम्या येत होत्या, परंतु काही कारणाने ही तारीख सतत पुढे ढकलली जात होती. नुकतेच काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केली आहे. (the wait is over akshay kumar’s bell bottom trailer will be able to watch on this day)

रंजीत तिवारी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १९ ऑगस्ट २०२१ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तसेच आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे हा चित्रपट ३ डी असणार आहे. या गोष्टीची माहिती अक्षयने एक व्हिडिओ शेअर करून दिली होती. त्याने सांगितले होते की, “१९ ऑगस्टला पूर्ण फीलसोबत ‘बेल बॉटम’ हा चित्रपट ३ डीमध्ये अनुभव घ्या.”

याआधी देखील या चित्रपटाबाबत सूत्रांनी माहिती दिली होती की, या चित्रपटाच्या निर्मात्यांची अशी इच्छा आहे की, हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित व्हावा. या चित्रपटासाठी अक्षय कुमारचे सगळे चाहते मागील याने दिवसांपासून या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता अखेर या प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. तसेच आता प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-करीना कपूरने बहीण करिश्मा कपूरसोबत मेजवानीचा लुटला भरपूर आनंद; मात्र नंतर जे झाले…

-कपिल शर्मा अन् भारती सिंगचे ‘बचपन का प्यार’ गाणे ऐकून पळून गेली त्यांची फॅन; पाहा हा मजेदार व्हिडिओ

-काय सांगता! चक्क बर्फाच्या पाण्यात केला त्यांनी रोमँटिक डान्स; बघतच राहिले प्रेक्षक

हे देखील वाचा