हिंदी चित्रपटसृष्टीत सध्याच्या काळात तरुण कलाकारांचे बोल्ड सीन्स सहज शुट केले जातात. चित्रपटांमध्ये अनेक अभिनेत्रींना बोल्ड सीन्स शुट करताना आपण पाहिले आहे. पण हिंदी चित्रपटसृष्टीतील काही कलाकार असे आहेत, ज्यांनी आपले पात्र साकारण्यासाठी वयोमर्यादेचीही पर्वा केली नाही. स्क्रीप्टच्या मागणीनुसार ज्येष्ठ कलाकारांना बोल्ड सीन्स शूट करावे लागले आहेत. या स्टार्समध्ये अमिताभ बच्चनपासून ते नसीरुद्दीन शाहपर्यंत कलाकारांच्या नावांचा समावेश आहे.
अन्नू कपूर
अभिनेते अन्नू कपूर हे चित्रपटसृष्टीचे सुप्रसिद्ध अभिनेते आहेत. अभिनयाव्यतिरिक्त अन्नू कपूर उत्तम गाणीही गातात. अन्नू कपूर यांनी या वयात बोल्ड सीन्स दिले आहेत. त्यांनी प्रियांका चोप्राच्या ‘सात खून माफ’ या चित्रपटात बोल्ड सीन दिला आहे.
ओम पुरी
‘डर्टी पॉलिटिक्स’ या चित्रपटात ओम पुरी यांना बऱ्याच दीर्घ काळानंतर एका नव्या स्टाईलमध्ये पाहिले गेले होते. या चित्रपटात त्यांनी अभिनेत्री मल्लिका शेरावतसोबत एक बोल्ड सीन दिला होता.
शक्ती कपूर
शक्ती कपूर यांनी पूनम पांडेसोबत ‘द जर्नी ऑफ कर्मा’ या चित्रपटात बोल्ड सीन्स दिले होते. हा चित्रपट बोल्ड आणि रोमॅंटिक सीन्सने भरलेला आहे. चित्रपटात शक्ती कपूर त्यांच्यापेक्षा ३९ वर्षांनी लहान असलेल्या पूनम पांडेसोबत पडद्यावर रोमान्स करताना दिसले होते. त्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी टीकाही केल्या होत्या.
नसीरुद्दीन शाह
नसीरुद्दीन शाह बॉलिवूडचे एक प्रसिद्ध अभिनेते आहेत. नसीरुद्दीन यांनी आपल्या शानदार कारकिर्दीत अनेक जबरदस्त चित्रपट दिले आहेत. काही चित्रपटांतील त्यांच्या बोल्ड सीन्समुळे त्यांना अनेकदा टीकेला सामोरे जावे लागले आहे. एका चित्रपटात नसीरुद्दीन शाह यांना त्यांच्या अर्ध्या वयाच्या अभिनेत्रीसोबत बोल्ड सीन्स द्यावे लागले. या चित्रपटानंतर त्यांना खूप ट्रोलही करण्यात आले होते.
अमिताभ बच्चन
चित्रपटसृष्टीतील सर्वात सुपरस्टार मानल्या जाणारे अमिताभ बच्चन यांनी देखील निश:ब्द चित्रपटात अभिनेत्रीसोबत जिया खानसोबत बोल्ड सीन दिले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-काय सांगता ‘जेह’ सैफ करीनाच्या मुलाचे खरे नाव नाही? मग काय आहे त्याचे नाव? जाणून घ्या
-अभिनव शुक्ला ‘या’ आजाराने आहे ग्रस्त, तर आजार स्वीकारण्यास लागली तब्बल २० वर्षे