Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ घालणार मोठ्या पडद्यावर धुमाकूळ! १०० टक्के क्षमतेने सुरू झाली चित्रपटगृहे

कोरोना महामारीमुळे गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटगृह बंद ठेवण्यात आले होते. अशात आता ५० टक्के क्षमतेने महाराष्ट्रामध्ये चित्रपटगृह खुली करण्यात आली आहेत. लॉकडाउननंतर अनेक राज्यांमध्ये चित्रपटगृह सुरू होत होते, पण यामधून महाराष्ट्र, केरळ आणि तमिळनाडू ही राज्ये वगळण्यात आली होती. आता हळूहळू सर्वत्र चित्रपटगृह सुरू होत असताना बॉलिवूड कलाकार आणि सिनेचाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.

एकीकडे महाराष्ट्रात चित्रपटगृह ५० टक्के क्षमतेने सुरू होत आहेत, तर दुसरीकडे दिल्लीमध्ये १०० टक्के क्षमतेने चित्रपटगृह सोमवार (१ नोव्हेंबर)पासून सुरू होत आहेत. दिल्लीमध्ये आता पूर्ण क्षमतेने चित्रपटगृह सुरू होत असले, तरीही देखील नियमांचे पालन करावे लागणार आहे. निर्देशांमध्ये असे लिहिले आहे की, “थिएटर, मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृह यांचे मालक तसेच संचालक यांना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर चित्रपटगृहात कोरोनापासून बचावासाठी आवश्यक ते सर्व सामान ठेवणे देखील बंधन कारक आहे. तसेच जर कोणीही नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल.” दिल्ली आपत्ती व्यवस्थापन आणि प्राधिकरणामार्फत हा आदेश जारी करण्यात आला आहे.

शासनाच्या या घोषणेने सर्व सिनेसृष्टीतील व्यक्ती खूप खुश आहेत. तसेच अनेकजण या निर्णयाचे स्वागत करत शासनाचे आभार देखील मानत आहेत. या वर्षी मोठ्या पडद्यावर अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ या दोघांचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चित्रपटगृहे १०० टक्के क्षमतेने खुली झाल्यास, अक्षयच्या चित्रपटाला फायदा होईल. तसेच सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘अन्नाथे’ देखील बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे.

येत्या काही दिवसांमध्ये जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते २’ आणि सलमान खान, आयुष शर्मा या दोघांचा ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ देखील चित्रपटगृहांमध्येच प्रदर्शित होणार आहेत. या आधी काही कमी बजेटचे चित्रपट देखील प्रदर्शित झाले आहेत. ज्यामध्ये अक्षय कुमारचा ‘बेलबॉटम’, कंगना रनौतचा ‘थलायवी’ आणि अमिताभ बच्चन यांचा इम्रान हाश्मीबरोबर असलेला ‘चेहरे’ या चित्रपटांचा समावेश आहे. ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृह सुरू झाल्याने अनेकांच्या रोजगाराचा देखील प्रश्न सुटला आहे आणि सर्व जण आनंदी आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चाहत्यांसाठी खुशखबर! रजनीकांत यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, फोटो केले शेअर

-जान कुमार सानू सिद्धार्थ शुक्लाला देणार ट्रिब्यूट? नवीन गाण्याची घोषणा करताच ट्रोलर्सने साधला निशाणा

-दारूच्या ब्रँडची ऍड केल्यामुळे, काजल अग्रवालवर भडकले नेटकरी; ‘या’ शब्दांत केलं तिला ट्रोल

हे देखील वाचा