श्रीदेवी(Sridevi) या हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने त्यांनी अनेक वर्ष हिंदी चित्रपट जगतात वर्चस्व गाजवले. श्रीदेवींच्या सौंदर्याचे आणि अभिनयाचे कित्येक चाहते आपल्याला आजही पाहायला मिळतात. अशातच शनिवारी (१३ ऑगस्ट ) रोजी श्रीदेवी यांचा स्मृतीदिन आहे. चला या निमिताने जाणून घेऊया एक खास किस्सा.
हिंदी चित्रपटातील पहिली सुपरस्टार अभिनेत्री म्हणून श्रीदेवींच्या नावाचा उल्लेख आजही केला जातो. त्यांच्या चित्रपटांची, गाण्यांची जादू आजही प्रत्येक भारतीयाला भुरळ घालत असते. श्रीदेवी जरी आज आपल्यात नसल्या, तरी त्यांचे चित्रपट आजही लोकप्रिय आहेत. पाहूया श्रीदेवींनी भूमिका साकारलेले काही प्रसिद्ध चित्रपट.
सदमा
श्रीदेवींच्या गाजलेल्या चित्रपटात ‘सदमा’ चित्रपटाचे नाव पहिल्यांदा घेतले जाते. १९८३ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ज्यामध्ये अभिनेते कमल हासन आणि श्रीदेवी यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. चित्रपटातील श्रीदेवींच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.
चांदनी
‘चांदनी चांदनी’ हे गाणे आजही प्रत्येकाच्या ओठावर असते. १९८९ आलेला ‘चांदनी’ चित्रपट श्रीदेवींचा सुपरहिट चित्रपट ठरला होता. या चित्रपटाच्या यशाने श्रीदेवीला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. यश चोप्रा यांचा हा रोमँटिक चित्रपट ऋषी कपूर आणि श्रीदेवी यांच्या अभिनयाने चांगलाच गाजला.
लम्हे
अभिनेत्री श्रीदेवींचा डबल रोल असलेला हा चित्रपट १९९१ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटात श्रीदेवीसोबत अनिल कपूर आणि अनुपम खेर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटातील श्रीदेवींच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.
लाडला
श्रीदेवी आणि अनिल कपूर या सदाबहार जोडीने ‘लाडला’ चित्रपटात धमाल केली होती. हा चित्रपट १९९४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. चित्रपटात अभिनेत्री रवीना टंडननेही प्रमुख भूमिका साकारली होती.
चालबाज
हिंदी चित्रपटसृष्टीतील तीन लोकप्रिय कलाकारांनी या चित्रपटात काम केले होते. ज्यामध्ये श्रीदेवी, रजनीकांत, आणि सनी देओल यांचा समावेश होता. हा चित्रपट १९८९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
मिस्टर इंडिया
श्रीदेवीच्या अभिनयाच्या जादूने प्रसिद्ध झालेला हा चित्रपट आजही लोकप्रिय आहे. या चित्रपटात अभिनेता अनिल कपूर आणि श्रीदेवी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. चित्रपट १९८७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
- कोण आहे जुही चावलाची मुलगी? आयपीएलच्या लिलावात आर्यन आणि सुहाना खानसोबत फोटो व्हायरल
- Happy Birthday | छोट्याशा कारकिर्दीत विनोद मेहरा यांनी १००हून अधिक चित्रपटांत केलं काम, ‘असा’ होता जीवनप्रवास
- निर्माते मुद्दाम टाकत असत चित्रपटात झीनत यांच्या अंघोळीचा सीन; कित्येक वर्षांनी कारण आलं समोर
हेही पाहा-