Saturday, July 6, 2024

दिलीप जोशी यांच्या आधी ‘या’ पाच कलाकारांना जेठालालच्या भूमिकेसाठी झाली होती विचारणा

टीव्हीचा सुप्रसिद्ध कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील सर्वच पात्र खूपच गाजलेली आहेत. अगदी जेठालाल दयापासून, भिडे, बबिताजी, तारक मेहतापर्यंत सर्वच कलाकार आता प्रेक्षकांच्या घरातील एक सदस्यच बनले आहेत. ‘जेठालाल’ या पात्राला तर संपूर्ण जगणे डोक्यावर घेतले. याच भूमिकेने दिलीप जोशी यांना नवीन ओळख मिळवून दिली. २००८ पासून दिलीप जोशी ही मालिका आणि यातील ‘जेठालाल’ ही भूमिका करत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की, दिलीप जोशीच्या आधी निर्मात्यांनी ५ कलाकारांना ही भूमिका देऊ केली होती. मात्र सर्वांनी ही भूमिका नाकारली आणि शेवटी दिलीप जोशी यांच्या पदरात ही भूमिका पडली. या संधीचे त्यांनी सोने केले आणि त्यांच्या करियरसाठी ‘जेठालाल’ टर्निंगचा पॉईंट ठरली. या लेखातून जाणून घेऊया ‘त्या’ पाच कलाकारांबद्दल ज्यांनी ही भूमिका नाकारली. (these actor rejected jethalal role in tarak mehta ka ulta chashma)

 

राजपाल यादव :

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोच्या निर्मात्यांनी जेठालालची भूमिका बॉलिवूडचे प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेते असणाऱ्या राजपाल यादव यांना साकारण्याची संधी दिली होती. परंतु राजपाल यादव यांना बॉलिवूडवर लक्ष केंद्रित करायचे होते आणि टेलिव्हिजनवर काम करायचे नव्हते. त्यामुळे त्यांनी हे पात्र साकारण्यास नकार दिला.

किकू शारदा :

‘द कपिल शर्मा’ शो द्वारे आपली छाप पाडणाऱ्या किकू शारदालासुद्धा जेठालालच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते. परंतु त्याने एका दीर्घ मालिकेत काम करण्याची ऑफर नाकारली. त्याचबरोबर त्याने असे ही म्हटले की, तो फक्त स्टँड-अप कॉमेडीमध्ये आनंदी आहे.

अली असगर :

‘कहानी घर घर की’, ‘कुटुंब’, ‘कॉमेडी सर्कस’, ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ यांसारख्या शोमधून अभिनेता अली असगरने खूप प्रसिद्धी मिळवली. त्याला देखील जेठालालच्या भूमिकेसाठी विचारले गेले होते. परंतु अली असगर त्याच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ही भूमिका करू शकला नाही.

एहसान कुरेशी :

स्टँड-अप कॉमेडियन एहसान कुरेशीलाही ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शोच्या निर्मात्यांनी जेठालालची भूमिकेची ऑफर दिली होती. पण त्याने हे पात्र साकारण्यास नकार दिला. पण त्याने असे का केले याचे कोणतेही कारण देण्यात आले नाही.

 

योगेश त्रिपाठी :

‘भाभीजी घर पर हैं’ या विनोदी मालिकेत हप्पू सिंगची भूमिका साकारणारा योगेशला जेठालालच्या भूमिकेची ऑफर मिळाली होती. पण त्यांनी ही भूमिका नाकारली होती.

 

 

या सर्वांमध्ये दिलीप जोशी यांना ही भूमिका मिळाली आणि आज जेठालाल म्हटले की, फक्त दिलीप जोशी यांचा चेहरा डोळ्यासमोर येतो. दिलीप जोशी आणि जेठालाल हे एकमेकांना पूरक झाले आहेत.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी स्वत:ला स्टारकिड मानत नाही’; अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे मोठे वक्तव्य

-‘इंडियन आयडल १२’च्या ग्रँड फिनालेने टेलिव्हिजन विश्वात नोंदवला ‘हा’ खास विक्रम; टीमने आनंद साजरा केला

-‘बिग बीं’च्या सुरक्षेत तैनात हेड कॉन्स्टेबलची झाली बदली; पगाराची माहिती मिळताच बॉडीगार्डविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश

हे देखील वाचा