लवकरच २०२१ हे वर्ष संपून आपण २०२२ मध्ये प्रवेश करणार आहोत. २०२१ या वर्षातील सुरुवातीचे काही महिने आपल्यासाठी किंबहुना सर्वांसाठी कोरोनामुळे खूपच त्रासदायक ठरले. मात्र वर्षातला उत्तरार्ध सर्वांसाठीच दिलासादायक ठरला. बॉलिवूडसाठी आणि बॉलिवूडमधील कलाकारांसाठी देखील हे वर्ष सरासरीच होते. सुरुवातीच्या काळात चित्रपटगृह बंद असल्यामुळे चित्रपटांच्या टीमने ओटीटीला पसंती दिली. मात्र त्यानंतर जसजसे चित्रपटगृह खुले झाले तसतसे अनेक मोठ्या चित्रपटांनी दणक्यात एन्ट्री घेतली. या वर्षी अनेक चांगले सिनेमे, वेबसिरीज प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या. अनेक कलाकारांनी त्यांच्या दमदार आणि प्रभावी अभिनयाने सर्वांकडूनच वाहवा मिळवली. यावर्षात मोजके असे कलाकार होते ज्यांच्या अभिनयाची भुरळ सर्वांच्या मनात कोरली गेली. या लेखातून जाणून घेऊया अशाच काही कलाकारांची नावे.
कार्तिक आर्यन:
कॉमेडी आणि रोमँटिक चित्रपटांमध्ये जास्त आवडणारा कार्तिक यावर्षी त्याच्या अभिनयाच्या एका नव्या पैलूने ‘धमाका’ करून गेला. काही दिवसांपूर्वीच कार्तिकचा ‘धमाका’ हा सिनेमा प्रदर्शित झाला यात तिने आजवरचा सर्वात उत्तम आणि प्रभावी अभिनय केल्याची प्रतिक्रिया लोकांनी दिली.
तारा सुतारिया :
ताराने खूप कमी काळात स्वतःच एउत्तम नाव या इंडस्ट्रीमध्ये प्रस्थापित केले आहे. जास्त सिनेमे केले नसले तरी ताराची लोकप्रियता आणि प्रसिद्धी तुफान आहे. यावर्षी ताराचा ‘तडप’ सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमात तिचा अभिनय सर्वानाच खूप आवडला.
विकी कौशल :
विकी कमालीचा ताकदीचा अभिनेता आहे, हे त्याने वेळोवेळी सिद्ध केले आहे. यावर्षी विकीचा बहुप्रतिक्षित ‘उधम’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्याने या सिनेमातून पुन्हा एकदा सर्वांगावर भुरळ घातली.
नुसरत भरुचा :
या यादीतले हे नाव म्हणजे सरप्राईजच म्हणावे लागेल. नेहमी बऱ्यापैकी एकसारख्या भूमिका करणाऱ्या नुसरतने यावर्षी कमल केली. ‘अजीब दास्तां’ आणि ‘छोरी’ या दोन सिनेमातलं तिच्या अभिनयाने सर्वानीच तिची प्रशंसा केली.
विद्या बालन :
प्रभावी आणि बोलक्या अभिनयासाठी सर्वप्रथम नाव येते ते विद्या बालन. यावर्षी विद्याचा ‘शेरनी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमातून तिने अभिनयाची एक वेगळीच बाजू सर्वांना दाखवून सुखावून टाकले.
मनोज बाजपेयी :
एक उत्तम अभिनेता म्हणून मनोज बाजपेयी ओळखला जातो. यावर्षी मनोज यांच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा ‘फॅमिली मॅन’ सिरीजचा दुसरा भाग प्रदर्शित झाला. या सिरीजने तुफान लोकप्रियता तर मिळवली सोबतच मनोज यांच्या अभिनयाचे कौतुक देखील खूप झाले.
के. के. मेनन :
के. के. मेनन देखील एक उत्कृष्ट अभिनेते आहे. नेहमीच हटके भूमिका साकारून सर्वांना त्यांची दखल घ्यायला भाग पडणाऱ्या के के यांची यावर्षी ‘स्पेशल ऑप्स १.५’ ही सिरीज प्रदर्शित झाली. या सिरीजमधून त्यांनी लोकांवर एक वेगळीच छाप सोडली.
हेही वाचा :