Thursday, November 21, 2024
Home बॉलीवूड बॉलिवूडमधील ‘या’ कलाकारांची एक चूक त्यांना पडली खूप महागात, थेट करियरच झाले उध्वस्त

बॉलिवूडमधील ‘या’ कलाकारांची एक चूक त्यांना पडली खूप महागात, थेट करियरच झाले उध्वस्त

अभिनय क्षेत्रात आपले स्थान निर्माण करणे हे कोणत्याही कलाकारासाठी सोपे नसते. सोबतच बॉलिवूडमध्ये मिळालेले यश मिळालेले यश टिकवून ठेवणे सुद्धा खूप अवघड आहे. बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांना भरपूर यश मिळाले पण ते यश टिकवून ठेवता आले नाही. असे म्हटले जाते की, कलाकार बनणे सोपे आहे, परंतु ते स्टारडम टिकवणे खूप कठीण आहे. अनेक कलाकार आले ज्यांनी उंची गाठली पण ते त्यांचे पाय जमिनीवर ठेवण्यात अपयशी ठरले. असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी स्वत:च्या हातांनी त्यांचे करिअर उद्ध्वस्त केले. त्यांच्या एका चुकीमुळे एका रात्रीत त्यांचे करिअर उद्ध्वस्त केले. पाहूया अशाच काही कलाकारांची नावे. 

१. विवेक ओबेरॉय

अभिनेता विवेक ओबेरॉय जो सलमान खानशी पंगा घेण्यासाठी आणि स्वत: च्या हातांनी करियर उध्वस्त करण्यासाठी ओळखला जातो. ‘कंपनी’ आणि ‘साथिया’ यांसारख्या चित्रपटांनी विवेकने बॉलिवूडमध्ये त्याची स्थान तयार केले. जेव्हा त्याने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले, तेव्हा सर्वांनाच वाटले की, विवेक लांबी रेस का घोडा आहे. पण ऐश्वर्यासोबत ‘क्यों हो गया ना’ मध्ये काम करत असताना तो तिच्या प्रेमात पडला. ऐश्वर्याबरोबरच्या त्याच्या वाढत्या जवळीकमुळे, तो सलमान खानच्या निशाण्यावर आला आणि सलमानविरोधात अविचाराने त्याने एक गोष्ट केली आणि तो बॉलिवूडमध्ये मागे पडला.

Photo Courtesy Instagramvivekoberoi

२. शक्ती कपूर

विनोदी भूमिकांपासून ते खलनायकी भूमिकांपर्यंत सर्वच भूमिका शक्ती कपूर याची अगदी प्रभावी पद्धतीने पडद्यावर उभ्या केल्या. पण २००५ मध्ये शक्ती कपूरचे एका वाहिनीने स्टिंग ऑपरेशन केले. ज्यामध्ये तो कास्टिंग काऊचमध्ये दोषी ठरला. एकेकाळी प्रत्येक चित्रपटाचा भाग असलेल्या शक्ती कपूरच्या चित्रपट कारकिर्दीवर या स्टिंगचा खोल परिणाम झाला.

३. फरदीन खान

फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खान एकेकाळी बॉलिवूडच्या दिग्दर्शक-निर्मात्यांच्या यादीत अव्वल अभिनेत्यांपैकी एक होता. पण फरदीन खान स्वतःच्या हातांनी आपली कारकीर्द उद्ध्वस्त करण्यासाठी ही ओळखला जातो. एकेकाळी चॉकलेट बॉय बनून बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झालेला होता. पण फरदीन खान कोकेन बाळगल्याबद्दल दोषी ठरला होता. त्यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने त्याला अटक केली. त्यामुळे फरदीन खानची कारकीर्द खराब झाली.

४. शाइनी आहुजा

आपल्या अभिनयाने ‘गँगस्टर’ चित्रपटात इमरान हाश्मीला मागे टाकणाऱ्या शायनी आहुजा यांनी कठोर संघर्षानंतर बॉलिवूडमध्ये यश मिळवले. पण २००९ मध्ये त्याच्यावर मोलकरणीने बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणानंतर त्याला सात वर्षांची शिक्षा झाली. बॉलिवूडमध्ये स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात शाइनीची कारकीर्द पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.

५. अमन वर्मा

शक्ती कपूर प्रमाणेच अमन वर्मा देखील एकेकाळी आपल्या पात्रांद्वारे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत होता. २००५ मध्ये, शक्ती कपूर व्यतिरिक्त, अमन वर्मा देखील कास्टिंग काऊचमध्ये दोषी आढळला. ज्याचा त्याच्या कारकिर्दीवर मोठा परिणाम झाला. तेव्हापासून अमन वर्मा आपली कारकीर्द सुधारण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला यात यश मिळाले नाही.

अजून बरेच कलाकार या यादीत सामील आहेत. कदाचित यशाची धुंदी या कलाकारांच्या डोक्यात जात असावी आणि त्यामुळेच त्यांना आपण काय करतोय ते चांगले आहे की वाईट हे देखील ओळखता येत नसेल.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनुष्काला आठवले बालपणीचे जुने दिवस; व्हिडिओ शेअर करत म्हणाली,’इथेच मी पोहायला…’

सिड-कियाराने साजरी केली लग्नानंतरची पहिली होळी; फोटो शेअर करत म्हणाला, ‘पहिली होळी मिसेज…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा