जेव्हा दिग्दर्शक आणि निर्माते त्यांच्या चित्रपटाची कथा लिहितात, वाचतात तेव्हा त्यांना त्या कथेवरून जाणवते की कोणते कलाकार त्या कथेतील पात्रांना योग्य न्याय देऊ शकतील. कथेनुरूप कलाकारांची निवड केली जाते. प्रत्येक कलाकाराचे गुण-दोष दिग्दर्शक, निर्मात्यांना माहित असतात त्यामुळे ते आपल्या चित्रपटासाठी कलाकारांची निवड करताना सर्व बाजूने विचार करतात आणि मगच निर्णय घेतात. मात्र असेही बरयाचदा घडत असते की, विशिष्ट कलाकाकारांची निवड तर केली जाते, शुटिंगही सुरु होते, मात्र मध्ये असे काहीतरी घडते ज्यामुळे त्या कलाकाराला सिनेमातून बाहेर पडावे लागते. पुढे त्या कलाकाराऐवजी दुसऱ्याला ती भूमिका सोपवली जाते. चित्रपटातून बाहेर पडणारे कलाकार सिनेमाचे थोडे शूटिंग झाल्यानंतरही बाहेर पडतात किंवा शूटिंगच्या आधी देखील. सिनेमे सोडण्यामागे अनेक वैयक्तिक, व्यायसायिक कारणं असतात. आज आपण या लेखातून अशा काही अभिनेत्री बघणार आहोत, ज्यांना एखादा रोल ऑफर झाला, मात्र मधेच त्यांना काही कारणास्तव तो सिनेमा सोडावा लागला.
चलते चलते :
या सिनेमात राणी मुखर्जी आणि शाहरुख खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. मात्र सर्वात आधी या चित्रपटासाठी शाहरुखसोबत ऐश्वर्या रायला घेतले होते. मीडिया रिपोर्टनुसार त्याच काळात ऐश्वर्या आणि सलमान यांचे ब्रेकअप झाले होते, त्यामुळे या चित्रपटाच्या सेटवर त्या दोघांचे खूप भांडणं व्हायचे. याला कंटाळून चित्रपटाच्या निर्मात्यांनी ऐश्वर्याऐवजी राणीला या सिनेमासाठी कास्ट केले.
बोलबच्चन :
या सिनेमात रोहित शेट्टीला अभिषेक बच्चनसोबत जेनेलिया डिसुझाला कास्ट करायचे होते. मात्र त्यावेळी ती दुसऱ्या एका चित्रपटात व्यस्त होती. त्यामुळे तिने ही भूमिका करायला नकार दिला. पुढे या भूमिकेसाठी रोहितने प्राची देसाईला घेतले होते.
कल हो ना हो :
या चित्रपटात शाहरुख खान आणि प्रीती झिंटा मुख्य भूमिकेत झळकले होते. मात्र निर्मात्यांची पहिली पसंती करीनाला होती. जेव्हा करीनाला ही भूमिका ऑफर झाली तेव्हा तिची फी ऐकून निर्मात्यांनी तिच्याऐवजी प्रीतीला या रोलसाठी घेतले.
हिरोइन :
मधुर भांडारकरांच्या या सिनेमात करीनाने मुख्य भूमिका साकारली होती. पण या रोलसाठी ऐश्वर्या पहिली पसंती होती. असे म्हटले जाते की, ऐश्वर्यासोबत थोडे शुटिंगही करण्यात आले होते, मात्र त्याच काळात ती प्रेग्नेंट राहिली आणि तिने हा सिनेमा सोडला. मग निर्मात्यांनी करीनाला चित्रपटात घेतले.
ऑल इज वेल :
‘ऑल इज वेल’ या चित्रपटासाठी सुरुवातीला निर्मात्याने राजनेता, आणि अभिनेत्री स्मृती ईराणी पाहिजे होत्या. २०१२ साली त्यांची मुख्य भूमिका असणारा आहे सिनेमा आला असता , मात्र त्यांनी राजकारणामुळे या चित्रपटाला नकार दिला. पुढे ही भूमिका सुप्रिया पाठक यांना देण्यात आली होती.
कहो ना प्यार है :
कहो ना प्यार है :
या सिनेमातून ऋतिक रोशन आणि एक्ट्रेस अमीषा पटेल यांनी त्यांचे पदार्पण केले होते. मात्र सर्वप्रथम या चित्रपटासाठी करीना सर्वांची पसंती होती. तिने थोडे शूट देखील केले होते, मात्र पुढे तिने हा सिनेमा काही कारणास्तव सोडला.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–बॉलिवूडचे ‘हे’ मोठे सिनेमे ठरले नुसताच फुसका बार, कमाईतून बजेट वसूल करणे देखील झाले मुश्किल
–बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्रींनी लग्नानंतर त्यांच्या यशस्वी चित्रपटांच्या करिअरला ठोकला रामराम