‘योद्धा’मध्ये दिशा पाटनीची लागली वर्णी, लग्नानंतर विकी कौशल परतला कामावर; वाचा आठवड्यातील टॉप ५ बातम्या


बॉलिवूडच्या गल्ल्यांमध्ये रोजच काहींना काही घडतच असते. नवीन चित्रपटांबद्दल मळणारी माहिती, चित्रपटातील कलाकारणबद्दल मिळणारी माहिती, इतर अनेक अपडेट इथे मीडिया आणि लोकांची समीकरणं बदलवत असतात. आज आपण या लेखातून पाच बातम्यांची माहिती घेणार आहोत.

‘योद्धा’मध्ये दिशा पाटनीची लागली वर्णी

धर्म प्रोडक्शनच्या अंतर्गत तयार होणारा बहुचर्चित अशा ‘योद्धा’ सिनेमात दिशा पाटनीची धमाकेदार एन्ट्री झाली आहे. ही माहिती खुद्द करण जोहारनेच सर्वांना दिली असून, दिशासोबतच राशी खन्ना देखील सिनेमात असणार असल्याची माहिती त्याने पोस्टर शेअर करून दिली आहे. ११ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा आणि दिशा पाटनीचा ऍक्शन अवतार सर्वांना पाहायला मिळणार आहे.

पवनदीप आणि अरुणिता यांनी केले लग्न?

यावर्षीचे इंडियन आयडलचे पर्व विविध कारणांनी तुफान गाजले. यातलेच महत्वाचे कारण म्हणजे पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल. या दोघांच्या प्रेमाच्या चर्चांनी त्यांना तुफान प्रसिद्धी मिळवून दिली. या दोघांच्या फॅन्सला त्यांच्या लग्नाबद्दल खूपच उत्सुकता होती. याच पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर एक फोटो खूपच व्हायरल होत असून, यात पवनदीप आणि अरुणिता यांचे लग्न होताना दिसत आहे. हा फोटो पाहून सर्वच नेटकरी त्यांना शुभेच्छा देताना दिसत आहे. मात्र हे चुकीचे असून, या दोघांचे लग्न अजून झालेले नाहीये. या फोटो देखील खोटा आहे.

 

लग्नानंतर विकी कौशल परतला कामावर

धुमधडाक्यात लग्न झाल्यानंतर विकी कौशल पुन्हा त्याच्या कामावर परतला आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम आकाउंटवरून एक फोटो शेअर केला असून, यामध्ये त्याने काळ्या रंगाची हुडी. चश्मा आणि काळ्या रंगाची टोपी घातली असून, तो त्याच्या गाडीमध्ये बसला आहे. या फोटोसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आधी कॉफी मग शूटिंग.”

कोरोनामुळे मुलांपासून दूर असलेल्या करीनाला येते मुलांची आठवण

करीना कपूर खान सध्या कोरोनाने संक्रमित असून, ती तिच्या कुटुंबापासून दूर विलगीकरणात आहे. हळूहळू ती यातून बरी होत असतानाच मुलांना सोडून राहणे तिला खूपच अवघड झाले आहे. कोरोनाकाळात सैफसोबत प्रेमाबद्दल बोलून झाल्यावर आता तिने तैमूर आणि जेहसाठी एक प्रेमळ आणि भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

आरआरआर चित्रपटाची परदेशात ऍडव्हान्स बुकिंग

रामचरण, जुनियर एनटीआर आणि आलिया भट्ट सध्या त्यांच्या आगामी ‘आरआरआर’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. एस एस राजमौली यांच्या या सिनेमाने तुफान बज तयार केला असून, या सिनेमाबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूपच उत्सुकता आहे. भारतातच नाही तर परदेशातही सिनेमाबद्दल प्रेक्षक आतुर दिसत असून, सिनेमाच्या प्रदर्शनाच्या एक महिन्याआधीपासूनच तिकिटं बुक होण्यास सुरुवात झाली आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!