Saturday, September 30, 2023

अभिनेत्यासह उत्तम दिग्दर्शक देखील आहे सोहेल खान, ‘या’ हिट चित्रपटांचं केलंय दिग्दर्शन

अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक म्हणून आपला ठसा उमटवणाऱ्या सोहेल खानला (Sohail Khan) आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. मात्र, सोहेल आता चित्रपट करण्यात फारसा रस घेत नाही. त्याने त्याच्या चित्रपट कारकिर्दीत नायक म्हणूनही काम केले. मात्र त्याचा मोठा भाऊ सलमान खान ज्या पद्धतीने हिरो म्हणून ओळखला जाऊ लागला, तशी लोकप्रियता सोहेलला मिळाली नाही.

सोहेल खानने आता त्याच्या आयुष्याचा अर्धा टप्पा पार केला आहे. सोमवारी (21डिसेंबर) सोहेल खानचा त्याचा 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म 20डिसेंबर 1970 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे झाला होता. प्रसिद्ध बॉलिवूड लेखक सलीम खान यांचा तो तिसरा मुलगा आहे. त्याच्या आईचे नाव सलमा खान आहे. त्याला सलमान आणि अरबाज हे दोन भाऊ आणि अलविरा अग्निहोत्री आणि अर्पिता खान शर्मा या दोन बहिणी आहेत. (Sohail Khan Birthday story)

सोहेल खानने आपले सुरुवातीचे शिक्षण त्याचा भाऊ सलमान खानसोबत सिंधिया स्कूल ग्वाल्हेरमधून केले. तर त्याचे लग्न सीमा सचदेवाशी झाले असून, त्यांना योहान आणि निर्वान ही दोन मुले आहेत.

जर आपण सोहेल खानच्या फिल्मी करिअरवर नजर टाकली, तर 1997मध्ये त्याने ‘औजार’ या सिनेमातून निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात त्याचा मोठा भाऊ सलमान खान आणि संजय कपूर मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटानंतर सोहेलने त्याचे दोन मोठे भाऊ सलमान खान आणि अरबाज खानसोबत ‘प्यार किया तो डरना क्या’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले. हा चित्रपट त्या काळातील सर्वोत्कृष्ट आणि हिट चित्रपट ठरला. या चित्रपटात काजोल मुख्य भूमिकेत होती.

यानंतर त्याने ‘हॅलो ब्रदर’ हा चित्रपट दिग्दर्शित केला जो चांगलाच गाजला. या चित्रपटात सलमान खान, अरबाज खान आणि राणी मुखर्जी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सोहेल खानने 2002मध्ये ‘मैंने दिल तुझको दिया’ या चित्रपटाद्वारे अभिनेता म्हणून पदार्पण केले. या चित्रपटात अभिनयासोबतच सोहेल खानने कथा लिहिली, दिग्दर्शन आणि निर्मितीही केली. मात्र, हा चित्रपट चालला नाही आणि बॉक्स ऑफिसवर जोरात आपटला. या चित्रपटात त्याच्यासोबत समीरा रेड्डी आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत दिसले होते.

एक अभिनेता म्हणून त्याचा ‘मैने प्यार क्यूं किया’ हा एक यशस्वी चित्रपट होता, ज्याने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला. या चित्रपटानंतर सोहेलने ‘आर्यन’ आणि ‘पार्टनर’ सारखे चित्रपट केले.

साल २०१० मध्ये सोहेल खान मोठ्या भावासोबत ‘वीर’ चित्रपटात दिसला होता. मात्र, हा चित्रपट सपशेल अपयशी ठरला. पण तरीही सोहेलने हार मानली नाही आणि 2014 मध्ये पुन्हा दिग्दर्शनाच्या जगात पाऊल ठेवले आणि ‘जय हो’ चित्रपटाची निर्मिती केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला नसला, तरी हा चित्रपट सरासरी होता. या चित्रपटातही सलमान खान मुख्य भूमिकेत होता आणि त्याच्यासोबत डेझी शाह होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मी हिंदू असतो किंवा माझे नाव…’, ‘पठाण’च्या वादात शाहरुखचा जुना व्हिडिओ आला समोर, सर्वत्र व्हायरल

भारत-पाक युद्धात हिरो ठरलेल्या भैरों सिंग यांचे निधन; ‘बॉर्डर’ सिनेमात सुनील शेट्टीने साकारली होती भूमिका

हे देखील वाचा