Thursday, December 5, 2024
Home बॉलीवूड ‘बिग बॉस १५’मधील ‘हे’ स्पर्धक राडा घालण्यात ठरत आहे अव्वल

‘बिग बॉस १५’मधील ‘हे’ स्पर्धक राडा घालण्यात ठरत आहे अव्वल

टीव्हीवरील सर्वात विवादित शो म्हणजे ‘बिग बॉस’. इथे कायमच स्पर्धकांमधील वाद पाहायला मिळतात. ‘बिग बॉस ओटीटी’ काही दिवसांपूर्वीच संपले आणि ‘बिग बॉस १५’ ला सुरुवात झाली. सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या ‘बिग बॉस १५’ मध्ये ‘बिग बॉस ओटीटी’ मधील देखील काही स्पर्धक आले आहेत.

पहिल्या दिवसापासूनच सर्व स्पर्धक रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत. प्रेक्षकांना येथील नवीन स्पर्धकांमध्ये होणारे वाद आणि मैत्री पाहायला खूप आवडत आहे. बिग बॉसच्या प्रत्येक पर्वात असे काही निवडक स्पर्धक असतात ज्यांच्या सहभागाने घरातील वातावरण कधीच शांत नसते. ते नेहमी टास्कमधून आणि त्यांच्या संवादांमधून स्वतःतील खरे गुण दाखवत असतात आणि त्यांचे काही किस्से प्रेक्षकांना शेवटपर्यंत आठवणीत राहतात. तर ‘बिग बॉस १५’मधील अशाच काही विवादित सदस्यांची माहिती करून घेऊ.

प्रतिक सहजपाल

सध्या बिग बॉसच्या घरामध्ये प्रतिकने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. करण जोहरच्या बिग बॉस नंतर तो आता सलमान खानच्या ‘बिग बॉस’मध्ये पोहचला आहे. त्याच्या क्युटनेसमुळे तो नेहमीच ओळखला जातो. अशात त्याची इतर स्पर्धाकांबरोबर होत असलेली भांडणे पाहून तो नेटकऱ्यांच्या चांगलाच चर्चेत आला आहे. विधी आणि जय बरोबर सध्या त्याची खूप भांडणे होत आहेत. यावर सलमान खानकडून त्याला ओरडा देखील मिळाला.

शमिता शेट्टी

शमितामुळे ‘बिग बॉस ओटीटी’ चांगलेच गाजले होते. कारण ज्यावेळी तिने घरात प्रवेश केला होता त्यावेळी राज कुंद्राला अटक करण्यात आली होती. अशात सध्या ती बिग बॉसच्या पंधराव्या पर्वात पोहचली आहे. इथे ती प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करताना दिसत आहे. स्पर्धकांबरोबर कधी तिचे वाद, तर कधी मैत्री पाहायला मिळत आहे. अनेक प्रेक्षकांमध्ये ती ‘बिग बॉस १५’ ची विजेती होणार अशीच चर्चा सुरू झाली आहे.

जय भानुशाली

जयने ‘डान्स इंडिया डान्स’ या शोमध्ये सलग चार पर्वांचे सूत्रसंचालन केले होते. तसेच अनेक मालिकांमध्ये देखील त्याचा दमदार अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला. ‘खतरों के खिलाडी’ नंतर तोही आता ‘बिग बॉस १५’ मध्ये पोहचला आहे. इथे आल्याबरोबर प्रतिक बरोबर त्याची भांडणे सुरू झाली. त्यामुळेच सध्या तो ही चर्चेचा विषय बनला आहे.

मायशा अय्यर

बिग बॉसच्या घरात अनेक असे स्पर्धक येऊन गेले आहेत यांची प्रेम कहाणी संपूर्ण देशाने पाहिली आहे. इथे आल्यावर अनेक कलाकारांचे प्रेमसंबंध जुळले आहेत. अशात सध्या ‘बिग बॉस १५’ची स्पर्धक मायशा देखील चर्चेचा विषय बनली आहे. ईशान सहगल बरोबर तिचे नाव सतत समोर येत आहे. त्या दोघांच्या प्रेम कहाणीवर प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. नुकतेच या दोघांमध्ये भांडण झाले होते. त्यावेळी ट्वीटरवर अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.

https://www.instagram.com/p/CUk8V3bh1Th/?utm_source=ig_web_copy_link

करण कुंद्रा

करण या शोमध्ये येण्याआधीच त्याची खूप चर्चा सुरू होती. सध्या तो ‘बिग बॉस १५’ मधील नंबर एकचा स्पर्धक म्हणून ओळखला जात आहे. इथे आल्यापासूनच शमिता बरोबर त्याची चांगलीच मैत्री जमली. तसेच प्रेक्षकांना त्याची भांडणे देखील पाहायला मिळाली. त्याने आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांची समीक्षकांची मने जिंकली आहेत. सध्या तो देखील बिग बॉसच्या घरात विजयी होणार असे काहींना वाटत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-महाअष्टमीचे निमित्य साधत अनुष्काने शेअर केला वामिकाचा फोटो, म्हणाली ‘रोज तुझ्यात…’

‘या’ कलाकारांनी गुपचूप लग्न करत चाहत्यांना दिला आश्चर्याचा सुखद धक्का

सैफ अली खानने तैमूरबद्दल केला खुलासा म्हणाला, ‘जेहच्या जन्मानंतर तैमूर अधिक…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा