सध्या सिनेमागृहात एकापेक्षा एक धमाकेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. चित्रपटांची आकर्षक कथा आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे हे चित्रपट प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत असतात. नेहमीप्रमाणे येणाऱ्या ऑगस्ट महिन्यातही असेच धमाकेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. पाहूया या कोणते आहेत ते बॉलिवूड चित्रपट, जे ऑगस्ट महिन्यात सिनेमागृहांमध्ये धुमाकूळ घालणार आहेत.
सीता रमण – या यादीतील पहिला चित्रपट मृणाल ठाकूर, रश्मिका मंदान्ना आणि दुल्कर सलमान यांचा ‘सीता रमन’ आहे. धमाकेदार एक्शन रोमँटिक चित्रपट असणारा हा चित्रपट ५ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांनाही जोरदार उत्सुकता लागली आहे.
डार्लिंग – ऑगस्ट महिन्यामध्ये येणारा आणखी एक धमाकेदार चित्रपट म्हणजेच डार्लिंग. चित्रपटात लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. हा बहुचर्चित चित्रपटल5 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर धडकणार आहे. या चित्रपटात आलियासोबत विजय वर्मा, रोशन मॅथ्यू आणि अभिनेत्री शेफाली शाह दिसणार आहेत.
रक्षाबंधन – अभिनेता अक्षय कुमारचा रक्षाबंधन चित्रपटही गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चेत आला आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमध्ये पुढचे नाव अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’ या चित्रपटाचे आहे. हा चित्रपट 11 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे, ज्यामध्ये चार बहिणी आणि एका भावाच्या म्हणजेच अक्षय कुमारच्या लग्नाची कथा दाखवण्यात येणार आहे.
लालसिंग चड्ढा – बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटात आमिर खानसोबत अभिनेत्री करीना कपूर आणि दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य यांच्याही भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. हा चित्रपटही 11 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे.
दोबारा- या यादीत अनुराग कश्यप दिग्दर्शित तापसी पन्नूच्या आगामी ‘दोबारा’ या चित्रपटाचेही नाव आहे. रहस्य आणि थरारांनी भरलेला हा चित्रपट १९ ऑगस्टला चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे. या सुपरहीट चित्रपटांमुळे ऑगस्ट महिना सिनेमा प्रेमींसाठी चांगलाच हाऊसफूल ठरणार आहे.
हेही वाचा- तब्बल २७ वर्षांपूर्वी अभिनेत्रीच्या मागे नाचणारा रेमो आज बनलाय प्रसिद्ध कोरिओग्राफ्रर, व्हिडिओ केला शेअर
फोटोमधील मुलगा आहे संगीत क्षेत्रातील कोहिनूर हिरा, १५ ऑगस्टला देशभर गुंजतो त्याचाच आवाज
सुंदर चेटकीण बनून सगळ्यांना घाबरवायला आलीय ‘पिशाचिनी’, ट्रेलर पाहून चाहत्यांची उडाली घाबरगुंडी