टेलिव्हिजन क्षेत्रात मालिकांसाठी किंवा काही मनोरंजनात्मक कार्यक्रमांसाठी अनेक नवनवीन जोड्या तयार होत असतात. अशा कार्यक्रमांसोबतच या जोड्याही अतिशय प्रसिद्ध होतात. कधी कधी प्रेक्षकांना या जोड्या खऱ्याच असल्याचे वाटू लागतं.
मात्र, या क्षेत्रात अशा देखील काही जोड्या आहेत, ज्या कॅमेऱ्यासमोर एकदम हिट आणि फिट आहेत. मात्र, कॅमेऱ्यामागे ते एकमेकांशी बोलणे तर दूर पण साधं ढुंकूनही पाहत देखील नाही. अशाच काही जोड्या आम्ही तुम्हाला आमच्या या लेखातून सांगणार आहोत.
१. अनिस रशीद – दीपिका सिंग
‘दिया और बाती’ या स्टार प्लसच्या लोकप्रिय मालिकेतील नायक, नायिका म्हणून या दोघांनी काम केले आहे. मालिकेत दिसणारी यांची सुंदर, समंजस जोडी फक्त कॅमेरा पुरताच मर्यादित होती. खऱ्या आयुष्यात ही दोघे एकमेकांसोबत बोलत देखील नव्हते. यामुळेच काही कालावधीनंतर मालिकेच्या शुटिंगवर आणि त्याच्यात असणाऱ्या केमेस्ट्रीवर याचा परिणाम जाणवायला लागला होता.

२. विकास गुप्ता – शिल्पा शिंदे
ही जोडी आणि यांच्यात असणारे वाद माहित नसणारी व्यक्ती क्वचितच सापडेल. बिग बॉस या रियालिटी शोज च्या वेळेला यांच्यात असणारे वाद जगासमोर आले. या कार्यक्रमात यांनी अतिशय मोठे वाद घातले होते. थोड्यावेळासाठी देखील यांचे एकमेकांशी पटत नाही.
३. रश्मी देसाई – सिद्धार्थ शुक्ला
कलर्स टीव्हीच्या ‘दिल से दिल तक’ या मालिकेत मुख्य भूमिका निभवणाऱ्या या जोडीचे असंख्य चाहते असतील. मात्र यांचे एकमेकांशी मालिकेत दिसणारे प्रेमळ वागणे खऱ्या आयुष्यात कधीच घडत नाही. हे सर्वांना बिग बॉस या शोजच्या दरम्यान समजले. मालिकेत दिसणारे यांचे प्रेमळ नाते खऱ्या आयुष्यात तितकेच खोटे आहे.
४. कपिल शर्मा – सुनील ग्रोव्हर
नेहमी सर्वांना हसवणारी ही जोडी सुरुवातीला एकमेकांचे पक्के मित्र होते. आपल्या कार्यक्रमातून या जोडीने सर्वांना खळखळून हसवले. मात्र, यांच्यात काहीतरी बिनसले आणि एकमेकांचे मित्र असणारे हे दोघे अचानक वेगळे झाला. याचा परिणाम त्यांच्या कार्यक्रमावर देखील झाला होता. त्यांच्या फॅन्सने त्यांना अनेक वेळा एकत्र या अशी विनंती देखील केली.
गोविंदा आणि कृष्णा अभिषेक
मामा आणि भाचा असणारे हे दोघे प्रेक्षकांना खूप भावत. जेव्हा जेव्हा यांनी एकत्र येऊन काम केले तेव्हा त्यांनी प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळवले. मात्र कौटुंबिक वादांमुळे मतभेदांचा परिणाम यांच्या कामावर देखील झाला आणि यांची जोडी तुटली.