Wednesday, June 11, 2025
Home बॉलीवूड ‘रियल’ लाइफ भावाबहिणींच्या जोड्या, ज्या गाजवतायेत मोठा पडदा; तर ‘या’ कलाकारांचा आहे यादीत समावेश

‘रियल’ लाइफ भावाबहिणींच्या जोड्या, ज्या गाजवतायेत मोठा पडदा; तर ‘या’ कलाकारांचा आहे यादीत समावेश

बहिण भावांची कितीही भांडणे झाली तरी, रक्षाबंधन आले की आपोआपच पाऊले आपल्या भावंडांकडे वळतात. चित्रपटसृष्टीमध्ये देखील अनेक भावाबहिणीच्या जोड्या आहेत. या जोडयांनी एकत्र चित्रपटांत काम देखील करतात. या भावाबहिणीच्या जोडयांनी अनेक वर्षे आपल्या सर्वांचे मनोरंजन केले आहे. आज आपण चित्रपट सृष्टीत सक्रिय असणाऱ्या खऱ्या आयुष्यातील भावंडांबद्दल जाणून घेऊ. 

सना कपूर – शाहिद कपूर
सना कपूर आणि शाहिद कपूर या दोघांचे खऱ्या आयुष्यात भावा बहिणीचे नाते आहे. चित्रपट सृष्टीमध्ये देखील त्यांनी एकमेकांबरोबर काम केले आहे. ‘शानदार’ या चित्रपटात हे दोघे एकत्र झळकले होते. सनाचा हा पहिलाच चित्रपट होता. शाहिद आणि सना एकमेकांचे सावत्र भाऊबहीण असले तरी त्यांचे नाते सख्या भावाबहिणीसारखेच आहे.

अमिषा पटेल – अस्मित पटेल
अमिषा आणि अस्मित पटेल ही भावाबहिणीची जोडी रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांची मने जिंकण्यात पाहिजे तशी यशस्वी झाली नाही. त्यातही अमिषा बरीच लोकप्रिय झाली मात्र अस्मित त्याची ओळख बनवूच शकला नाही.

श्रद्धा कपूर – सिद्धांत कपूर
शक्ती कपूर यांची ही दोन्ही मुलं चित्रपट सृष्टीमध्ये चांगलीच कारकीर्द करत आहेत. श्रद्धा एक उत्तम अभिनेत्री असून तिचा भाऊ सिद्धांत हा देखील एक अभिनेता व उत्तम सहाय्यक दिग्दर्शक आहे. ‘हसीना पारकर ‘ या चित्रपटात हे दोघं एकत्र झळकले होते.

सोहा अली खान – सैफ अली खान
हे दोघेही बहीणभाऊ अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. सोहाची चित्रपटातील कारकीर्द फारशी हिट ठरली नाही परंतु सैफ तिच्या पाठीशी कायमच खंबीरपणे उभा असतो. सैफ इतकी सोहाने लोकप्रियता आणि यश मिळवले नसले तरी ती बरीच चित्रपटांमध्ये झळकली आहे.

आरती सिंग – कृष्णा अभिषेक
आरती आणि कृष्णा हे दोघेही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. आरती मालिकांमध्ये सक्रिय असून यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तर कृष्णा त्याच्या कॉमेडीमुळे जगप्रसिद्ध आहे.

तर हे होते चित्रपट सृष्टीत अभिनयाने सर्वत्र हिट झालेले आणि खऱ्या आयष्यात एकमेकांचे बहिणभाऊ असलेले कलाकार.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ब्यूटी क्वीन’ डिंपल हयातीला रवी तेजाने दिले वाढदिवसाचे खास गिफ्ट; शेअर केला आगामी ‘खिलाडी’चा रोमॅंटिक पोस्टर

-खण स्कर्ट घालून रुपाली भोसलेने शेअर केले ‘हटके’ फोटोशूट, मात्र सर्वत्र रंगलीय ड्रेसची चर्चा

-‘ही’ व्यक्ती आहे अंकिता लोखंडेसाठी खूप खास; फोटो शेअर करत म्हणाली, ‘तू माझ्यासाठी…’

हे देखील वाचा