Saturday, April 19, 2025
Home कॅलेंडर काय सांगता.!! सुंदर दिसण्यासाठी ‘या’ अभिनेत्रींनी केलीये शस्त्रक्रिया, एकीने तर १३ वेळा गाठलाय दवाखाना

काय सांगता.!! सुंदर दिसण्यासाठी ‘या’ अभिनेत्रींनी केलीये शस्त्रक्रिया, एकीने तर १३ वेळा गाठलाय दवाखाना

बॉलिवूड म्हटलं की आपल्याला आठवतात त्या गोऱ्या-भोऱ्या सुंदर नायिका! पण तुम्हाला ठाऊक आहे का, हे सौंदर्य मिळवण्यासाठी या अभिनेत्रींना किती द्रविडीप्राणायम करावे लागतात.

अनेक अभिनेत्रींनी सुंदर दिसण्यासाठी प्ल‌ॅस्टिक सर्जरीचा आधार घेतला आहे. अनेक बड्या बड्या अभिनेत्रींचा या यादीत समावेश आहे. चला तर मग पाहुयात स्वतःला सौंदर्यवती म्हणवून घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये कोण कोण आहे या यादीत.

nora fatehi
nora fatehi

नोरा फतेही

स्ट्रीट डान्सर, बाहुबली भाग एक या अशा सिनेमांमधून, बिग बॉस सारख्या कार्यक्रमांमधून झळकणारऱ्या या अभिनेत्रीने नुकतीच हिप्स आणि ब्रेस्ट सर्जरी करून घेतली आहे. काही दिवसांपूर्वी इंडियाझ बेस्ट डान्सर या रिऍलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत ती आपल्याला दिसली होती.

अनुष्का शर्मा

रब ने बनादी जोडी, बँड बाजा बारात, पिके आशा अनेक सिनेमांमधून झळकणाऱ्या या अभिनेत्रीने देखील ओठांची सर्जरी केली आहे. २०१४ मध्ये अनुष्का शर्माने लीप फिलिंग करून घेतलं होतं. या सर्जरीनंतर जेव्हा बॉम्बे वेलवेट सिनेमातील तिचा पहिला लूक समोर आला होता तेव्हा नेटकऱ्यांनी तिला खूप ट्रोल देखील केलं होतं.

तिची तुलना नेटकऱ्यांनी प्रसिद्ध कार्टून पात्र डोनाल्ड डक याच्याशी केली होती. यानंतर चूक लक्षात आल्यानंतर तिने पुन्हा लीप करेक्शन केलं होतं.

Shruti Haasan
Shruti Haasan

श्रुती हसन

दाक्षिणात्य सिनेसृष्टीत भरपूर नाव कमावल्यानंतर लक या हिंदी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी ही अभिनेत्री! हिने सर्वांसमोर स्वतःहून चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी केल्याचं मान्य केलं आहे. आपला चेहरा सुंदर करण्यासाठी श्रुतीने आतापर्यंत १३ सर्जरीज केल्या आहेत.

जून महिन्यात ओठ मोठे करण्याकरिता तिने लीप फिलिंग करून घेतलं होतं. तिच्या म्हणण्यानुसार तिला प्लास्टिक सर्जरी केल्याचं मान्य करण्यामध्ये काहीच कमीपणा वाटत नाही.

प्रियांका चोप्रा

मिस वर्ल्ड बनून बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण करणाऱ्या या देसी गर्ल ने देखील सर्जरी केली आहे. तिच्या पूर्वीच्या सिनेमातील लूक च्या तुलनेत तिचा आत्ताचा लूक थोडा बदलला आहे. प्रियांकाने तिच्या ओठ आणि नाकात बदल करून घेतले आहेत. हा पण प्रियांकाने या गोष्टीला कधीच स्वीकारलं नाही.

वाणी कपूर

‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार्‍या वाणी कपूरच्या चेहऱ्यामध्ये अचानक मोठा बदल पहायला मिळाला. हा बदल तिच्या ओठांमध्ये होता, जो शस्त्रक्रियेनंतर खूप वाढला होता.

बेफिक्रे या चित्रपटात, तीचे ओठ पाहून तीची समाजमध्यमांमध्ये फार थट्टा केली गेली होती, काही लोक तर तीला बदक म्हणून संबोधित करू लागले होते.

आयेशा टाकिया

वॉन्टेड, संडे अशा सिनेमांमधून झळकणारी अभिनेत्री आयशा टाकिया लग्नानंतर चित्रपटांपासून दूर गेली. चित्रपटांमध्ये निरागस आणि गोंडस दिसणार्‍या या अभिनेत्रीने अचानक तिचे फोटो शेअर करुन सर्वांना धक्का दिला. कारण या फोटोंमध्ये तीचे मोठे ओठ दिसत होते, जे तीच्या खराब झालेल्या प्लास्टिक सर्जरीचे परिणाम होते. या सर्जरीनंतर आयेशाला ओळखणं देखील कठीण होऊन बसलं आहे.

राखी सावंत

बॉलिवूडमध्ये आयटम सॉंग करणारी तसेच बिग बॉस फेम राखी सावंत हिने आतापर्यंत अनेक शस्त्रक्रिया केल्या आहेत. राखी ने नाक, ओठ आणि स्तनांची शस्त्र क्रिया केली होती. सततच्या शस्त्रक्रियांमुळे राखीला लठ्ठपणा आला आहे.

Rakhi sawant
Rakhi sawant

मौनी रॉय

गोल्ड या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीने मालिका क्षेत्र अक्षरशः गाजवलं. मौनी ने प्लास्टिक सर्जरी करून घेतल्यांनातर तिचा चेहरा अधिकच सुंदर दिसू लागला. जेव्हा नागिन या मालिकेतून तिने पुनरागमन केलं तेव्हा तिला पाहून प्रत्येकजण दंग झाला होता.

हे देखील वाचा