Saturday, July 6, 2024

बॉलिवूडचे ‘हे’ कलाकार आहेत एकमेकांचे कट्टर दुश्मन, वादाची कारणे वाचून व्हाल थक्क

सिने जगतातील कलाकारांच्या मैत्रीचे, त्यांच्या प्रेमाचे अनेक किस्से ऐकायला मिळत असतात. परंतु बॉलिवूड कलाकारांच्या  प्रेमाचे, मैत्रीचे अनेक किस्से ज्याप्रमाणे ऐकायला मिळतात. त्याचप्रमाणे बॉलिवूड कलाकारांमध्ये कट्टर दुश्मनीही पाहायला मिळते. सिने जगतात असे अनेक कलाकार आहेत, ज्यांच्या वादाचे किस्से नेहमीच ऐकायला मिळतात. हे कलाकार त्यांचा वाद असलेल्या कलाकारांना त्रास देण्याची एकही संधी सोडत नाहीत. जाणून घेऊया अशाच बॉलिवूड कलाकारांमधील वादाचे गाजलेले किस्से. 

बॉलीवूडमधील सर्वात मोठा वाद म्हणून तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांचे नाव आधी घेतले जाईल. अभिनेत्री तनुश्री दत्ता अनेकदा नाना पाटेकर यांच्याविरोधात बोलताना दिसते. 2018 मध्ये तनुश्रीने सोशल मीडियावर MeToo मोहिमेत नाना पाटेकर याचे नाव घेऊन करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते, ज्यामध्ये तिने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. तेव्हापासून तनुश्री तिच्या पोस्ट आणि मुलाखतींच्या माध्यमातून बॉलीवूड माफियांवर सतत बोलत आहे. अनेकदा ती सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून नाना पाटेकरांवर आरोप करताना दिसते.

सलमान खान : विवेक ओबेरॉय –  बॉलीवूडमध्ये भाईजान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान याच्याबद्दल म्हंटलं तर कोणाचं वैर असू शकतं? त्यामध्ये विवेक ओबेरॉयचे नाव आधी घेतले जाईल. खरंतर अभिनेत्री ऐश्वर्या रायमुळे सलमान आणि विवेक एकमेकांचे कट्टर दुश्मन झाले. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांनी एकेकाळी एकमेकांना डेट केल्याचे सर्वांना माहीत आहे.  सलमान खानला ही गोष्ट आवडली नाही आणि तो विवेक ओबेरॉयवर चिडला. आजही दोन्ही स्टार्समध्ये कटुता आहे.

इमरान हाश्मी : मल्लिका शेरावत – ‘मर्डर’ चित्रपटात या दोन्ही स्टार्सची चांगलीच केमिस्ट्री पाहायला मिळाली. दोघांनी अनेक बोल्ड सीन्स चित्रित केले. मात्र, या चित्रपटानंतर दोघांनाही एकमेकांशी बोलणे आवडत नाही. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटानंतर मल्लिका शेरावत आणि इमरान हाश्मी यांच्यात भांडण झाले होते. तुम्हाला सांगतो की, ‘कॉफी विथ करण’च्या सेटवर अभिनेता इमरान हाश्मीने मल्लिका शेरावतला सर्वात वाईट सह-अभिनेत्री म्हटले होते.

कंगणा रणौत : करण जोहर-  बॉलिवूडची पंगा गर्ल म्हटली जाणारी कंगना रणौत आणि चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांचाही बॉलिवूडच्या कट्टर शत्रूंच्या यादीत समावेश आहे. कंगनाने करणला अनेकदा झळकले आहे. ती दररोज त्याच्यावर घराणेशाहीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करताना दिसत आहे.

हेही वाचा – कॉमेडियन नव्हे ‘या’ क्षेत्रात करिअर करणार होता झाकीर खान, वाचा रंजक किस्सा
एकेकाळी रणदीप हुड्डा करायचा गाड्या साफ अन् रेस्टॉरंटमध्ये काम; आज आहे बॉलिवूडचा स्टार
एवढा मोठा सुपरस्टार असूनही रस्त्याच्या मध्येच कार्तिकने साधला चिमुकल्या चाहत्याशी संवाद, व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा