आज काल बॉलिवूड कलाकार सिनेमामध्ये काम करता करता सोबत अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सुद्धा कार्यरत असतात. साईड बिजनेस म्हणून अनेक कलाकार अभिनयासोबतच दुसरे काम देखील करतात. याला कारण म्हणजे या क्षेत्रात असलेले चढउतार. अनेक कलाकारांना एका विशिष्ट वयोमानानंतर कामं मिळणं कमी होतं, अशा वेळी करियरच्या सर्वोत्तम काळात कलाकार इतर उद्योगात गुंतवणूक करतात. तर मंडळी बॉलीवूडकरांमध्ये अशाच साईड बिझनेसमध्ये काही कलाकारांचे प्रोडक्शन हाऊस आहेत, काही कलाकार हॉटेल्समध्ये गुंतवणूक करतात, काही कलाकारांचे फॅशन, ज्वेलरीचे स्वतःचे ब्रँड्स आहे, काही फिटनेस क्षेत्रात ऍक्टिव्ह आहे, काही इंटेरियर डेकॉरमध्ये गुंतवणूक करत असतात. कधी कधी तर आपल्याला जेव्हा कलाकारांच्या अशा इतर बिजनेसबद्दल समजते तेव्हा आश्चर्य सुद्धा वाटते.
नुकतीच बातमी आली की, कंगना राणावत मनालीमध्ये हॉटेल सुरु करत आहे. म्हणजेच कंगनाने देखील हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकले आहे. कंगना आधीही अनेक कलाकारांनी असच विविध इंडस्ट्रीमध्ये गुंतवणूक केली आहे, या लेखातून आपण अशाच काही कलाकारांबद्दल आणि त्यांच्या इतर व्यवसायांबद्दल जाणून घेऊया.
सुश्मिता सेन :
मिस युनिव्हर्स असणाऱ्या सुश्मिताने अनेक चित्रपटनमधून उत्तम अभिनय करत एक अभिनेत्री म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे. बऱ्याच काळापासून अभिनयपासून लांब असणाऱ्या सुश्मिताने ‘आर्या’ या वेबसेरीजमधून दमदार कमबॅक केले. तुम्हाला माहित आहे का की सुश्मिता अभिनयाव्यतिरिक्त तिच्या ज्वेलरी ब्रँडमधून जबरदस्त कमाई करते. तिचा ज्वेलरीचा बिजनेस तिची आई सांभाळते. यासोबतच तिचे तंत्र एंटरटेनमेंट नावाचे एक प्रोडक्शन हाऊस देखील आहे. शिवाय तिचे मुंबईमध्ये एक हॉटेल असून हे हॉटेल बंगाली डिशेशसाठी खूप प्रसिद्ध आहे.
शिल्पा शेट्टी :
अनेक वर्षांपासून शिल्पा देखील अभिनयपासून लांब असली तरी ती विविध शो मध्ये बऱ्याचदा दिसत असते. शिल्पा रेस्टोरंट, स्पा आणि बारच्या बिजनेसमध्ये सक्रिय आहे. शिल्पाने काही महिन्यांपूर्वीच मुंबईच्या वरळी भागात बेस्टियन चेन नावाने एक हॉटेल ओपन केले आहे.
जॅकलिन फर्नांडिस :
श्रीलंकन ब्युटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जॅकलिनने श्रीलंकेतील कोलंबोमध्ये तिने काएमासूत्र नावाने हॉटेल सुरु केले आहे. इथे दर्शन मुनीराम शेफ आहे. तिच्या हॉटेलमध्ये संपूर्ण श्रीलंकेतल्या प्रसिद्ध डिशेश मिळतात.
अर्जुन रामपाल :
हँडसम हंक अर्जुन रामपालचे दिल्लीच्या पॉश भागात फाइव्ह स्टार हॉटेल आहे. शिवाय लॅप नावाचा एक डिस्को आहे.
सोहेल खान :
सोहेल खानने काही वर्षांपूर्वी शिल्पा शेट्टीचा पॉइजन नावाचा एक क्लब खरेदी केला होता. टायचे आता नाव रॉयल्टी क्लब आहे. हा क्लब १०००० स्क्वेयर फूट इतका मोठा आहे. यूरोपियन टच असणारा हा क्लब एक इंटरनेशनल स्टेंडर्ड पब आहे.
बॉबी देओल :
अभिनेता बुबी देओल हा तीन हॉटेल्सचा मालक आहे. त्याचे पाहिले व्हेंचर नावाचे हॉटेल अंधेरी मुंबईमध्ये आहे. तिथे इंडो चायनीज डिशेश मिळतात. दुसरे हॉटेल सुहाना नावाचे आहे तिथे भारतीय डिशेश मिळतात. तर तिसऱ्या जियोन नावाच्या हॉटेलमध्ये चायनीज फूड चांगले मिळते.
आशा भोसले :
लोकप्रिय जेष्ठ गायिका अशा भोसले या देखील हॉटेलच्या मालकीण आहेत. त्यांनी दुबई, कुवैत, यूके आणि बर्मिंघम येथे भारतीय फूडचे हॉटेल काढले आहे.
डिनो मोरिया :
अभिनेता दिनो मोरिया त्याच्या भावासोबत हॉटेल्स चालवतो. त्याच्या हॉटेलचे नाव क्रीप स्टेशन आहे. त्याच्या या हॉटेलच्या शाखा भारताच्या नॉर्थ, वेस्ट आणि ईस्टर्न इंडिया येथे आहे.